
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
🔸 शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे रस्त्याअभावी शेतकऱ्यांची गैरसोय
——————————————
अमरावती :-अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कृषी कार्यालय हे मुख्य रस्त्यावर असुन तालुका कृषी कार्यालयात शेतकऱ्यानं समवेत कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांना रोज कसरत करावी लागत आहे.सध्या पावसाळा सुरू असताना कार्यालयातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल,डबके साचले आहे.त्यामुळे तालुका कृषी कार्यालयात दुचाकी नेणे किंवा पायी चालत जाण्या-येण्यासाठी तारेवरची कसरतच करावी लागत आहे.अशा दुरावस्था असलेल्या रस्त्यावरुन दुचाकीने जातांना दुचाकी घसरुन पडणे किंवा पायी चालताना घसरुन पडून किरकोळ अपघात होऊ शकतो आणि नाहक नागरिकांना त्रास होणार आणि त्यातही त्या रस्त्याने कार्यालयातील अधिकारी कर्मचारी,महीला कर्मचारी यांना तर दररोज जावे लागते तरीही प्रशासनाला भान नसुन अजुन पर्यन्त कृषि प्रशासनाला जाग आला नाही. का?शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार व पडलेल्या प्रश्नाने तात्पुरत्या स्वरूपात साधा मुरुम टाकून जाण्या-येण्याचा मार्ग सुरळीत करावा जेणेकरून होणारा किरकोळ अपघात होणार नाही.