
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
कुटुंब, समाज ,शाळा, महाविद्यालय, कॉलेज,या मध्ये आजपासून पंचवीस तीस वर्षे पुर्व असणारी शिस्त आज लोप पावत चालली आहे . मुलांच्या मध्ये प्रचंड , चंगळवाद,आळस, मान अपमान सहन न होण्याची वृत्ती , वाढती गैरशिस्त , आणि हाताबाहेर जाणारी मुलं हि सध्याच्या काळातील पालकांची सगळ्यात मोठी डोकेदुखी ठरत आहे.हे अगदी वास्तव आहे.हे पुर्ण सत्य नाही वाटलं तरी असत्य तर नक्कीच नाही.आणि त्या दिशेने मार्गावर असणारी तरूणाई हाताळणं पालकांच्या समोर आव्हान निर्माण करणारी आहे. सध्याच्या काळात आणि आपण जेव्हा लहान वयात होतो . त्या कालावधीत खुप मोठा क्रांतिकारी बदल झाला आहे. आपण त्यावेळी जे पाहिलं अनुभवलं ते हल्लीच्या मुलांच्या बाबतीत लागु होऊ शकत नाही. आणि आपण मुलांना आपण ज्या परिस्थितीतून आलो त्या परस्थिती सोबत जुळवुन घडविण्यासाठी प्रयत्न केला तर तो प्रयत्न थोडा अडचणी चा ठरेल . म्हणून मुलांना पचेल असा आता नवीन सुवर्ण मध्य काढून पालकांना मुलांच्या बाबतीत निर्णय घ्यावे लागतील महणुन पालकांना एक पाऊल माघर घेऊन मुलांशी जुळवून घेऊन त्यांचं हित करणं आवश्यक आहे. एकंदरीत आपला कालखंड तेव्हाची कौटुंबिक परस्थिती , आर्थिक अडचणी , कौटुंबिक शिस्त , वातावरण कमालीच वेगळ होतं .आपण ज्या परिस्थितीतून इथपर्यंत पोहोचलो .ती परिस्थिती हि प्रत्येकाच्या दृष्टीने एक इतिहास आहे. आणि त्या काळी असणारी प्रत्येक बाबीची दुर्मिळता , कुटुंबातील वेगवेगळ्या सदस्यांच वैचारिक मानसिक दडपण , आदरभाव ,शिस्त ह्या सगळ्या बाबी खुप आत्मियतेने कौटुंबिक जिव्हाळा ,जपला जयाचा ,मान सन्मान अपमान याच काही वाटत नव्हते कोण काय काय बोलायचं , अभ्यास नाही केला तर गुरूजी संकट घरातील गावातील कोणीही बोले ,वेळ प्रसंगी मार दिला जाई .पण योग्य अभ्यास करण्यासाठी कडक शिस्त होती शाळेत छडी होती .तर घरात प्रश्नांना ची कामाची सरबत्ती असयाची अनेक छोटी मोठी कामे करून शिक्षणावर लक्ष केंद्रित करावं लागे . एकत्र कुटुंब पद्धती असायची . आपल्या वडीलांचा जन्म कोणत्या प्राधान्य क्रमाने झाला त्यानुसार अनेक बाबी त्या त्या पद्धतीने मिळायच्या अगदी आज कुठेही घरोघरी असणारी चपाती पोळी वर्षातुन कधी तरी एखाद्या सणावाराला वाटयाला येत असे .कपडे तर विचारता सोय नाही.चप्पल असली तर नशिब . अगदी ठिगळा ठिगळाचे कापडे घालून शाळा गाठावी लागत असे .हे आजच्या मुलांना हे ऐकुन सुद्धा पचणार नाही . एवढ्या बिकट परिस्थिती मधुन मार्ग काढत आपण इथपर्यंत पोहोचलो आहेत.मग पालकांची एवढीच माफक इच्छा असते.कि आपणं जे भोगल अनुभवलं ते दुःख आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये . त्याला सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत .त्याने आपल्या पेक्षा जास्त प्रगती केली पाहिजे.हि पालकांची इच्छा काही लोक तर स्वतः रोजगार हमी वर काम करत शिकले . म्हणजे किती भयानक परिस्थिती मधुन आपण इथ पर्यंत पोहचलो आहेत .याची जाणीव पालकांना क्षणोक्षणी होते .या जाणिवेतून पालक मुलांच्या संदर्भात जागरूक असतात.पण अडचण हि आहे .कि आपलं दुःख हे मुलांना कळत नाही . जाणवतं नाही . भौतिक ऐश्वर्या एवढं प्रचंड फोफावलय कि मुलं त्यांच्या बाहेर पडुन विचार करतील अशी परिस्थिती धुसर आहे. आणि मग आपण आठवतो ती आपण अनुभवली ती शिस्त आणि आजची वाढणारी गैर शिस्त त्याकाळी असणारा शिस्त , जिव्हाळा त्या विरूद्ध बंड करण्याची त्याकाळी कल्पना सुद्धा सुचत नव्हती. आणि त्याकाळी असं धरिष्ठय कोणीही करू शकत नव्हतं पण आता तसं राहिलं नाही . शिस्त ऐकण्यासाठी जड आहे . अनुकरण कधी होणार आणि मग पालकांची चिंता तर स्वभाविक आहे. मग सध्याच्या मुलांचा स्वभाव बदलु शकत नाही.आणि पालकांचाही नक्कीच नाही .मग या मध्ये वैचारिक मत भेद हे मन भेदा पर्यंत पोहचण्या अगोदरच पालकांनी आपली रणनिती बदलून मधला मार्ग काढावा दोन पावलं मागे यावं आणि मुलांच्या भविष्याची चिंता योग्य आहे.ती योग्य पद्धतीने मुलांना आपुलकीने जवळ करून त्यांच्याशी मित्र प्रमाणे संवाद साधुन योग्य पद्धतीने परस्थिती हाताळावी जेणेकरून मुलांचं हित होईल आणि आपल्यला हि त्रास होणार नाही.
गणेश खाडे
संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक 9011634301