
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
नंदुरबार जि. लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस तर्फे सलग ९ वेळा निवडून येण्याचा विक्रम करणारे ८८ वर्षीय माणिकराव गावित यांनी नाशिकमध्ये खाजगी रुग्णालयांत शनिवारी सकाळी अखेरचा श्वांस घेतला. माणिकराव गावित यांनी ग्रामपंचायती पासून राजकारणाचा श्री.गणेशा करणाऱ्या माणिकराव गावितांना केंद्रीय गृह राज्यमंत्री, सामाजिक न्याय राज्यमंत्री हे पदे न मागताच मिळाली. संसदेतील सर्वात ज्येष्ठ खासदार म्हणून त्यांनी आपला चांगलाच ठसा उमटविला होता. नंदुरबार जिल्ह्यांमधून लोकसभा मतदारसंघातून ते सातत्यांने विजयी झाले. पान खाणारे, खासदार गाडीला हात दिला तर गाडी थांबवणारे खासदार व दांडगा जनसंपर्क असणारा नेता म्हणून त्यांची चांगलीच ओळख होती. सुमारे पाच शतकाची संसदेतील कारकीर्द मध्ये असूनही माणिकरावांवर कुठल्याही गैरप्रकारचा आरोप झाला नाही. शनिवारी सकाळी त्यांचे नाशिक येथील खाजगी रुग्णालयांत उपचार दरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा निरोप घेतला. ते कार्यकर्त्यांमध्ये दादासाहेब म्हणून चांगलेच लोकप्रिय झाले होते. माणिकराव गावित यांचे पुत्र भरत गावित यांनी ट्विटवरुन वडिलांच्या निधनांची बातमी दिली. माणिकराव गोविंद यांच्या जाण्यांमुळे राजकीय वर्तुळामध्ये शोककळा पसरली.