
दैनिक चालु वार्ता भुम प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम – रविवारी राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्या स्थानिक विकास निधीतून, नगर विकास खात्याकडून व संजय गाढवे यांच्या प्रयत्नातून काँक्रीटीकरण करण्यात आलेल्या शहरालगत असलेल्या महादेव मंदिर कसबा ते काळी भुई शिवार,माळी वस्ती,हवालदार वस्ती या रस्त्यास मा.नगराध्यक्ष संजय गाढवे व जिल्हा नियोजन समिती सदस्या संयोगिता संजय गाढवे यांनी सदिच्छा भेट दिली .सदरील रस्त्याचे काम जलद गतीने व उत्कृष्ट दर्जाचे केल्याबद्दल या भागातील शेतकऱ्यांच्या वतीने मा.नगराध्यक्ष संजय गाढवे व जिल्हा नियोजन समिती सदस्या संयोगिता गाढवे यांचा ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून सपत्नीक सत्कार करण्यात आला.मागील अनेक वर्षांपासून या शिवारातील शेतकऱ्यांना,नागरिकांना पावसाळ्यात चिखल तुडवत या रस्त्याने घराकडे,शेतात जावे लागत होते.तसेच महिला,जेष्ठ नागरिक व शाळकरी मुलांना देखील त्रास सहन करावा लागत होता.मात्र संजय गाढवे यांनी या रस्त्याच्या कामाचा शासन स्तरावर पाठपुरावा करून हा रस्ता जलद गतीने व उत्कृष्ट दर्जाचा करण्यासाठी प्रयत्न केले.या शिवारात शेती करत असलेले शेकडो शेतकरी यांच्या चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात आनंद दिसून आला.यावेळी सर्व शेतकऱ्यांनी संजय गाढवे व संयोगिता गाढवे यांची ट्रॅक्टर मधून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून त्यांचा सपत्नीक सत्कार केला.मिरवणुकी दरम्यान वस्तीवर राहणाऱ्या महिला शेतकरी यांनी गाढवे दांपत्याचे औक्षण करून साखर भरवत स्वागत केले.यावेळी बोलताना संजय गाढवे म्हणाले की,शहरातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय म्हणजे शेती असून जर शेतीतून भरघोस उत्पन्न निघाले तरच आपण आपल्या कुटुंबाची प्रगती करू शकतो,आणि त्यासाठी शेतातील रस्ते मजबूत असणे गरजेचे असते, म्हणूनच मी शहरातील सर्व शेतकऱ्यांच्या शेतातील रस्त्यांच्या कामांना प्रथम प्राधान्य दिले आहे.पुढील काळात या तयार करण्यात आलेल्या शेत रस्त्यावर पथदिवे बसविण्यात येणार असून वस्तीवर,शेतात राहत असलेल्या शेतकऱ्यांना पक्की घरे बांधण्यासाठी देखील प्रयत्न करणार असल्याचे संजय गाढवे यांनी यावेळी सांगितले.यावेळी काही वयोवृद्ध शेतकऱ्यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करून संजय गाढवे यांच्या कार्याचे कौतुक केले.यावेळी शंकर गाढवे, हनुमंत गाढवे,मा.नगरसेवक संजय पवार,भाऊसाहेब नाईकवाडी, तोफिक कुरेशी,सुनील थोरात,अमोल भोसले,सुनील माळी,शहाजी साबळे,शीतल शहा,रणजित कुंभार,शकील शेख,आदेश माळी,सचिन माळी,धनंजय शेटे,मधुकर माळी,राम बागडे,बाळू सुर्वे,नायकिंदे,बापू माळी,सतीश माळी,अमोल माळी, गोवर्धन माळी,धनंजय माळी,बाळू रीटे, मुशीर शेख,सलीम मोगल यांच्यासह शेकडो शेतकरी बांधव उपस्थित होते.