दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -कवि सरकार इ़ंगळी
प्रतिष्ठा फाउंडेशन व गुरुवर्य सेवा फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने “गुरुवर्य सन्मान पुरस्कार” व “साहित्य सन्मान पुरस्कार” वितरण आज “सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज कोर्टी, पंढरपूर ” येथे करण्यात आले. सदर कार्यक्रमांमध्ये आंधळी ता. पलूस जि. सांगली येथील सुप्रसिद्ध गझलकार सिराज शिकलगार यांना–
“साहित्य सन्मान पुरस्कार” बहाल करण्यात आला.
गझलकार सिराज शिकलगार यांची आतापर्यंत १८ पुस्तके प्रकाशित झाली असून या वर्षी त्यांचे ७ गझलसंग्रह प्रकाशित होत आहेत. त्यांना आजपर्यंत महाराष्ट्रातील विविध संस्थांचे राज्य व राष्ट्रीय पातळीवरील २० हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत.
सदर कार्यक्रमाला पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माननीय लक्ष्मणरावजी ढोबळे हे उपस्थित होते. समारंभाचे अध्यक्ष सिंहगड कॉलेजचे प्राचार्य डॉ. कैलास करांडे सर हे होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा.तानाजीराजे जाधव यानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
