
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
नांदेड : – अल्पकालावधीतच जेवणासाठी स्वादिष्ट , चवदार , व अल्पदरात तालुक्यात नव्हे तर राज्यभरात लोहा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या टेकाळे बंधु यांच्या हाॅटेल चिंतामणी येथील स्पेशल आलु बिर्याणी व स्पेशल खिचडीचा व अल्प दरात स्वादिष्ट जेवण मिळत असल्याने हाॅटेल चिंतामणी शुद्ध शाकाहारी बोलबाला अनेक ठिकाणी ऐकावयास मिळत आहे. टेकाळे बंधु यांच्या हाॅटेल चिंतामणी येथे स्पेशल आलु बिर्याणी व स्पेशल खिचडीचा चवदार अस्वाद घेण्यासाठी तालुकाभरासह पुणे , मुंबई , संभाजीनगर , लातुर , परभणी हिंगोली, सोलापूर , नांदेड येथे प्रवास करणारे प्रवासी पण छञपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या हाॅटेल चिंतामणी येथील स्वादिष्ट व चवदार भोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय समोर जात नाहीत. विशेष म्हणजे फक्त १० रूपये प्लेट आलु बिर्याणी व १० रूपये प्लेट खलु खिचडी अल्प दरात असल्याने व अल्प कालावधीत जेवणाची स्वादिष्टता ठेवल्याने व अल्पदरात असल्याने हाॅटेलवर तुडुंब गर्दी जेवणासाठी असलेली दिसून येत आहे . व या रूचकर भोजनामुळे तालुक्यात नव्हे राज्यभरात हाॅटेल चिंतामणी येथील स्पेशल आलु बिर्याणी व स्पेशल खिचडीचा बोलबाला दिसुन येत आहे. या हाॅटेलला नांदेड दक्षिणचे आमदार मोहन आण्णा हंबर्डे यांनी भेट दिली.
नांदेड दक्षिण मतदार संघाचे आमदार मोहन आण्णा हंबर्डे यांनी चिंतामणी हाॅटेलमधील शुद्ध शाकाहारी आलु बिर्याणी व स्पेशल खिचडीचा , भाज्यांचा आस्वाद घेतला.
टेकाळे परीवारातील तिन्ही मुले अत्यंत मेहनती कष्टाळु असुन हाॅटेल चिंतामणीमध्ये स्पेशल शुद्ध शाकाहारी आलू बिर्याणी व स्पेशल खिचडी अतिशय स्वादिष्ट दररोज बनवतात व अत्यंत अल्प दरात ग्राहकांना सेवा देतात हि उल्लेखनीय बाबा आहे.
आ. मोहन आण्णा हंबर्डे ( आमदार दक्षिण नांदेड मतदारसंघ )
लोहा शहरात सामान्य व्यक्तीलाच अल्पदरात आपण शुध्द शाकाहारी विशेष म्हणजे स्वादिष्ट जेवणाची व्यवस्था केली अतिशय उल्लेखनीय बाब असुन या हाॅटेलमध्ये तळमळीने कार्य करणारे मारोती टेकाळे लक्ष्मण टेकाळे व विष्णूकांत टेकाळे यांना व्यवसाय वृद्धीसाठी यावेळी नांदेड दक्षिणचे आमदार मोहन आण्णा हंबर्डे यांनी शुभेच्छा दिल्या.