
दैनिक चालू वार्ता किनवट प्रतिनिधी -दशरथ आंबेकर
किनवट तालुक्यातील जलधरा आश्रम शाळेतील असंख्य विद्यार्थ्यांना सकाळी दहा वाजता देण्यात आलेल्या जेवणामधील वांग्याच्या भाजी मधून वीष बाधा झाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले त्या विद्यार्थ्यानं वर हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले .
या बाबत सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयलयात काजल तांबारे, सरिता पिंपळे, पूजा ढोले ,जयश्री डूडुळे, दिव्या ढोले, चांदणी मेंडके ,वैष्णवी मिराशे, वंदना डुकरे, संध्या शेळके, ओमसाई ढाले , सह दिव्या मेंडके ह्या अकरा विद्यार्थ्यांच्या पोटात दुखत असल्याचे समजताच तेथील शिक्षकांनी त्या विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय हिमायतनगर येथे आणले असता त्यांच्या जेवणातून विषबाधा झाल्याचे उघडकीस आले
तेव्हा संबंधित घटनेची माहिती विचारण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांनी गर्दी केली तेव्हा असे कळले की जलधरा आश्रम शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सकाळी देण्यात येणाऱ्या जेवणातील वांग्याच्या भाजी मधून विषबाधा झाल्याने ह्या शाळेतील असंख्य विद्यार्थ्यांचे पोट दुखून त्यांना उलट्या होत असल्याचा गंभीर प्रकार घडला तेव्हा या आश्रम शाळेत अंदाजे ४००विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे समजले या सर्व विद्यार्थ्यांनी सकाळी १० ते ११ च्या दरम्यान जेवण केले
काही वेळा नंतर शाळेतील ८ विद्यार्थिनीच्या पोटात दुखत असल्याचे समजताच त्या विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले तेव्हा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. गायकवाड साहेब व डॉ.माधव भुरके यांनी सर्व विद्यार्थ्यांची तपासणी केल्यानंतर त्यातील ५ विद्यार्थी सिरियस असल्याचे आढळून येताच त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आल्याचे डॉक्टरांनी संगितले
उपचारा दरम्यान जलधरा आश्रम शाळेतील अजून बऱ्याच विद्यार्थांच्या तब्याती बिगडत असल्याचे समजल्याने हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयाची एक टीम सबंधित आश्रम शाळेच्या घटना स्थळी पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले त्यामुळे बातमी लिही पर्यंत ११ विद्यार्थांना विष बाधा झाल्याचे सांगण्यात आले होते व अजून विद्यार्थी वाढण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे…