
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
=====================
अहमदपूर/प्रतिनिधी दि:- २१/०९/२०२२ राज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत चाकुर येथील बहुचर्चित असलेल्या एम आय डी सी ला अखेर मंजूरी देण्यात आली आहे.
सन 2019 मध्ये चाकुर तालुक्यातील जनतेच्या विकासासाठी
तत्कालीन आमदार माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी चाकुर येथे एम आय डी सी करण्यासाठी अटोकाट प्रयत्न केले होते.जवळपास जागा निश्चित करून नामफलकाचा अनावरणाचा सोहळा सुद्धा संपन्न होताच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली.याचे श्रेय विनायकराव पाटील यांना जाऊ नये म्हणून विरोधकांनी अपप्रचार करुन एम आय डी सीला विरोध केला.एम आय डी सी मंजूर नसल्याचे पत्रक काढून जनतेची ऐन निवडणुकीत दिशाभूल केली . दरम्यान सतातंर होऊन विनायकराव पाटील यांचा पराभव झाला. तदनंतर सरकार सुद्धा विरोधी पक्षाचे स्थापन झाल्याने एम आय डी सीचा प्रश्न तसाच राहुन गेला होता.गेल्या दोन महिन्याखाली भाजप शिवसेना युतीचे सरकार स्थापन होताच स्वताचा पराभव पचवून जनतेच्या कल्याणासाठी माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी पुन्हा चाकुर एम आय डी सी मंजूर करण्यासाठी पुढाकार घेतल्याने आज अखेर एम आय डी सी ला मंजुरी मिळाली.
चाकुर तालुक्यातील जनतेच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या प्रश्नांची सोडवणूक केल्या बद्दल भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सह मंत्री मंडळाचे आभार व्यक्त केले आहेत.