
दैनिक चालु वार्ता खानापुर सर्कल प्रतिनिधि -माणिक सुर्यवंशी
आज दि.21/9/2022रोजी यमुनाबाई भा.पा.मा व उच्च मा.विद्यालय नायगाव येथे नायगाव तालुका खाजगी मुख्याध्यापक संघाची सहविचार सभा घेण्यात आली या सहविचार सभेचे अध्यक्ष नायगाव प.स चे उपसभापती मा.श्री संजय पाटील शेळगावकर होते.तसेच नांदेड जिल्ला मुख्याध्यापक संघाचे कोषाध्यक्ष तथा तालुका मु.अ संघाचे अध्यक्ष श्री नकाते सर,नांदेड जिल्ला शिक्षण मंडळावर महीला प्रतिनीधी म्हणुन बिनविरोध निवड झालेल्या सौ.गोपछडे मॅडम,जिल्ला शिक्षण मंडळावर नायगाव तालुका प्रतिनीधी म्हणुन बिनविरोध निवड झालेले श्री मनोहर पाटील सर व मा.श्री प्राचार्य
फाजगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली. सर्वप्रथम जिल्ला शिक्षण मंडळावर महीला प्रतीनिधी म्हणुन बिनविरोध निवड झालेल्या सौ.गोपछडे मॅडम,जिल्ला शिक्षण मंडळावर नायगाव तालुका प्रतीनीधी म्हणुन बिनविरोध निवड झालेले श्री मनोहर पाटील सर यांचा सत्कार करण्यात आला. व तालुका मु.अ संघाची नवीन कार्यकारणी ची निवड करण्यात आली.
अध्यक्षःश्री नकाते सर मु.अ सुजलेगाव
उपाध्यक्षः1)श्री एकनाथ कल्याण सर मु.अ नायगाव
2)शिवाजी गायकवाड मु.अ रातोळी
सचिवःश्री बन्नाळीकर सर मु.अ रुई(बु)
सहसचिवःश्री शिवपुजे सर
कोषाध्यक्षःश्री रमेश गायकवाड सर
सहकोषाध्यक्षःश्री वरवटे सर
प्रवक्ताःश्री कोतेवार सर
सदस्यःसौ.वडगावकर मॅडम
यांची निवड करण्यात आली व नवीन कार्यकारणीत निवड झालेल्या सर्व मुख्याध्यापकाचे सत्कार करण्यात आले यावेळी तालुक्यातील सर्व मु.अ उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कोतेवार तर आभार श्री गायकवाड सर यांनी केले.