
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:आगार प्रमुख अशोक चव्हाण यांची मे महिण्यात कंधार आगारात बदली झाल्यानंतर तब्बल साडेचार महिण्यांनी देगलूर आगाराला अमर पाटील यांच्या रूपाने कायम आगार प्रमुख मिळाले आहेत. नवीन आगार प्रमुखासमोर आगाराचे उत्पन्न वाढविण्याबरोबरच आगाराचा अंत कारभार सुधारण्याचे मोठे आव्हान आहे.
अशोक चव्हाण हे कोरोनाचे संकट उद्भवण्यापूर्वी देगलूरला आगार प्रमुख म्हणून आले होते. कोरोनाचे संकट टळल्यानंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांनी परिवहन महामंडळाला राज्य शासनाच्या सेवेत सामावून घेण्याबरोबरच अन्य मागण्यांसाठी तब्बल साडेसहा महिने बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले, हे कामबंद आंदोलन २२ एप्रिल २०२२ रोजी न्यायालयाने दिलेल्या अल्टिमेटमनंतर मागे घेण्यात आले. त्यानंतररोजी न्यायालयाने दिलेल्या अल्टिमेटमनंतर मागे घेण्यात आले. त्यानंतर जवळपास सर्व कर्मचारी कामावर हजर झाले. परिवहन महामंडळाची बससेवा पूर्ववत सुरू झाल्यानंतर १ मे पूर्वी अशोक चव्हाण यांची कंधार येथे आगार
प्रमुख पदावर बदली झाली, १ मे रोजी माहूरहून बदली होऊन आलेले रविंद्र पाटील यांनी प्रभारी आगारप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. अवघ्या एका महिन्याच्या आत कार्यशाळा प्रमुख पदावर आलेल्या यमेलवाड यांच्याकडे प्रभारी आगार प्रमुखाचे पद सोपविण्यात आले. ५ ऑगस्ट रोजी संजय आकुलवार या आगारात बदलीवर आले. त्यांच्याकडे आगारप्रमुखाचे पद सोपवण्यात आले. अखेर १५ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र यांच्यापुढे राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चेन्नई आहे. (श. प्र. महामंडळाच्या यांनी ५ सप्टेंबर रोजी परिपत्रक (सामान्य आस्थापना आदेश क्र. २९५ (सेम) सन २०-२२) काढून एका वर्षाचे सेवापूर्ण प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अमर रामराव पाटील यांना देगलूर आगाराचे कायम आगार प्रमुख म्हणून नेमणूक दिली. अशाप्रकारे नांदेड जिल्ह्यातील एका अत्यंत महत्त्वाच्या आगाराला तब्बल साडेचार महिन्यानंतर कायम आगारप्रमुख मिळाले. नवीन आगार प्रमुख अमर पाटील आगाराचे उत्पन्न वाढविणे, हा मोठा प्रश्न आहे. या सदर्भात लोकल अँप च्या माध्यमातून अनेक वेळा बातम्या प्रकाशित करण्यात आल्या होत्या.