
दैनिक चालु वार्ता मलकापूर (प्रतिनिधी):– तालुक्यात मागील एक महिन्यापासून लम्पी आजारामुळे जवळपास 600 जनावरांना संसर्ग झाला आहे. व त्यातील काही दगावल्याची माहिती आहे यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात चिंतेत असून संबंधित विभाग कोणतीही ठोस पावले उचलताना दिसत नाही व औषधे शेतकऱ्यांना स्वखर्चाने घ्यावी लागतात अशीच बाब निदर्शनास आली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पशुधन विकास अधिकारी व पशुधन विस्तार अधिकारी यांना निवेदना मार्फत जनावरांसाठी ठोस निर्णय घेऊन लागेल ते औषधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आली अन्यथा मेलेली जनावरे कार्यालयात आणून टाकू असा धमकी इशारा देण्यात आला. त्यावेळी स्वाभिमानीचे संघटनेचे तालुका अध्यक्ष सचिन शिंगोटे, स्वाभिमानी पक्षाचे तालुकाध्यक्ष निलेश नारखेडे, योगेश गावंडे, ईश्वर लासूरकर, ज्ञानेश्वर गावंडे, यांच्यासह आदी जण उपस्थित होते.