
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:महसूल विभाग मार्फत देण्या येणारे जात नॉन रहिवासी ईडब्ल्यूएससह विविध प्रमाणपत्रे आता शाळेत मिळणार असून यासाठी देगलूर विभागाच्या सहाय्यक जिल्हाधिकारी सौम्या शर्मा यांचे तहसील गटविकास अधिकारी सर्व जिल्हा परिषद शाळा खाजगी अनुदानित प्राथमिक शाळा सर्व माध्यमिक शाळा यांच्यासह सीएससी सेतू केंद्रांना सूचना केल्या आहेत.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी लागणाऱ्या कागदपत्रामुळे अडचणी निर्माण होत आहेत अचानक कागदपत्रे काढण्यामुळे विद्याथ्र्यांसह त्याच्या पालकांनाही त्रास होतो पण वेळे अगोदरच प्रमाणपत्र पालकाच्या हातात राहिल्यास व त्याच अडचणी येणार नाहीत तसेच सर्व सामान्य जनतेची कामे विहित कालावधीत होण्याच्या अनुषंगाने व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑगस्ट पर्यंत महाराष्ट्रातसेवा पंधरवाडा केला जात आहे.
या काळात मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शाळेतच विविध प्रमाणपत्रे वाटप करण्यात येणार आहेत यात उत्पत्र नॉन क्रिमिनल जात प्रमाणपत्र रहिवासी राष्ट्रीयत्व ईडब्ल्यूएससह अशी विविध प्रमाणपत्रे शाळेत कॅम्प लावून विद्यार्थ्यांना विहित कालावधीत 1 दिली जाणार आहेत यासाठी शाळेतील मुख्याध्यापकांनी विद्याथ्र्यांचे कागदपत्रे जमा करून जवळ असलेल्या सीएससी व सेतू चालकांकडे सादर करावीत अशी सूचना देण्यात आल्या आहेत.