
दैनिक चालू वार्ता खानापूर सर्कल प्रतिनिधी -माणिक सुर्यवंशी
सविस्तर वृत्त असे की , देगलुर तालुक्यातील वन्नाळी येथे एक पशुवैद्यकीय दवाखाना आहे. या दवाखान्यात वझरगा सह तपशेळगाव, लखा, आळंदी, या गावातील पशुपालकांच्या आजारी पडलेल्या गाय, बैल, यासह अनेक पाळीव व अपाळीव पशुंना या पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार केला जातो.
सध्या देगलुर तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्र राज्यात पाळीव प्राणी असणारे गाय, बैल, कालवड, गोरे, मैस आदी जनावरांना संसर्गजन्य रोग असलेल्या लंपी स्किन या संसर्गजन्य रोगावर बहुतांश जनावरांना ग्रासलेले असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्याच अनुषंगाने नांदेड जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून प्रत्येक पशुवैद्यकीय दवाखान्यात हा रोग जनावरांना होऊ नये म्हणून त्या रोगाचे प्रतिबंधक लस देण्यात येत आहे त्या अनुषंगाने वन्नाळी येथे असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याचे वैद्यकीय अधिकारी सुरेश पाष मवार यांनी ता. 22 रोजी तालुक्यातील वझरगा येथे जाऊन गाय, बैल, गोऱ्हे, कालवड, वासरे असे एकूण 210 जनावरांना लंपी प्रतिबंधक लस दिली आहे. यावेळी देगलुर येथील गट विकास अधिकारी शेखर देशमुख, अशोक झाडे विस्ताराधिकारी, नारायण जाधव लेखा अधिकारी, यांनी गावातील सर्व शेतकरी व पशुपालकांना आव्हान करीत १०० टक्के गावातील जनावरांना लसीकरण झाले पाहिजे यावर भर दिला आहे. अशी माहिती येथील पशुवैद्यकीय अधिकारी सुरेश पाशमवार यांनी कळविले आहे.