
दैनिक चालु आहे वृत्तसेवा –
मुख्याधिकारी नगरपरिषद कार्यालय परतुर यांच्याकडे दिनांक २३ सप्टेंबर २०२२ रोजी निवेदन तक्रार करण्यात आली परतूर नगरपरिषद हद्दीतील गट क्रमांक २४८ मध्ये लोकवस्ती नाही प्लॉट व्यवसायिकाला प्लॉटिंगचे चांगले प्रकारे पैसे यावेत म्हणून हा शासकीय निधी वापरला का ? परतूर शहरात अनेक ठिकाणी सार्वजनिक शौचालय नाहीत, शहरी भागात मुतारी नाही. जनहितार्थ अनेक सुविधा पासून नागरिक वंचित आहेत,परंतु गट क्रमांक २४८ या जमिनीवर प्लॉट व्यवसायकाने प्लॉटिंग पाडून प्लॉटिंग विक्री करणे चालू आहे,या गट २४८ क्रमांक मध्ये दिशा उत्तरेकडून प्लॉटिंग जमिनीमध्ये आपल्या नगरपरिषद कार्यालयाने शासकीय निधी वापरला तो तो खर्च झालेला पैसा संबंधित प्लॉट व्यवसाय यांच्याकडून वसूल करण्यात यावा नसता जनहितार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची अपेक्षा आहे,कारण चुकीच्या पद्धतीने वस्ती नसलेल्या ठिकाणी गट क्रमांक २४८ मध्ये शासकीय निधी वापरत तो पैसा खर्च करून खाजगी प्लॉटिंग व्यवसाय काला सहकार्य केल्यामुळे कारवाई झालीच पाहिजे कारण,हा खूप गंभीर विषय आहे. योग्य ती कार्यवाही न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने परतूर नगरपरिषद कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने देण्यात आला आहे…