
दैनिक चालू वार्ता कौठा सर्कल प्रतिनिधी -आनंदा वरवंटकर
वरवंट :- कंधार तालुक्यातील वरवंट येथील श्री. खंडोबाच्या मंदिर बांधकामासाठी नांदेड जिल्हाचे लोकप्रिय खासदार श्री. प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांनी ७००००० लाख रुपये निधी खासदार निधीतून दिला आहे. त्याबद्दल वरवंट येथील नागरिकांच्या वतीने खासदार साहेबांचा सत्कार श्री.रामचंद्र पाटील कऊटकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बारुळ येथील श्री. शंकरराव नाईक साहेब, बोरी (बु.) चे सरपंच श्री. बालाजीराव पाटील झुंबाड, श्री. मधुकरराव पाटील पाये,राहटीचे पत्रकार श्री. बालाजी पाटील कौंसल्ये, तसेच गावातील नागरिक व परिसरातील कार्यक्रते आणि खंडोबाचे भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.