
दैनिक चालू वार्ता लोहा ग्रा प्रतिनिधी -राम कराळे
जोशीसांगवी :- लोहा तालुक्यातील जोशीसांगवी येथील श्री. बाळ ब्रह्मचारी वैरागी महाराज विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. गोविंद शंकरराव गायकवाड यांची स्वाभिमानी शिक्षक संघटना नांदेड जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मुख्याध्यापक श्री. गायकवाड सरांचे शिक्षण क्षेत्रातील व शाळेतील अनुभव लक्षात घेता सर्व शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांघा मोलाचा वाटा राहिल, त्यांच्या नांदेड जिल्हातील शिक्षकांशी चांगला जनसंपर्क आहे. त्याअनुषंगाने स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री. के. पी. पाटील सर तसेच श्री. ज्ञानेशभाई चव्हाण, श्री.ज्ञानेश्वर शेळके सर, नेहाताई गवळी यांनी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी मु.अ.गायकवाड सरांना देण्यात आली. त्यामुळे गायकवाड सरांना सर्व शिक्षक बांधवांनी तसेच दैनिक चालू वार्ताचे पत्रकार बाजीराव गायकवाड यांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा देऊन गौरवण्यात आले आहे.जिल्हाध्यक्षपदाची,जबाबदारी दिल्याबद्दल गायकवाड सरांनी स्वाभिमानी शिक्षक संघटनेच्या सर्व पदाधिकारी यांचे आभार मानले आहेत.