
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
नांदेड येथील आझाद ग्रुपच्या सोहळ्यास लोहा तालुक्यातील कार्यकत्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आझाद ग्रुपचे लोहा तालुकाध्यक्ष रुद्रा पाटील भोस्कर यांनी केले आहे.
लोकहित सर्वोपरी हे बिद्र वाक्य घेऊन अल्पावधीतच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आझाद ग्रुपचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रभर होत असुन आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भीमाशंकर मामा कापसे यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड येथे दि. २५ सप्टेंबर रोजी हाॅटेल गणराज पॅलेस येथे सकाळी १० ते ५ या वेळेत नांदेड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा सोहळा व नियुक्ती प्रमाण -पत्र कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शन आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भीमाशंकर मामा कापसे हे करणार असुन या कार्यक्रमाला लोहा तालुक्यातील आझाद ग्रुपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आझाद ग्रुपचे लोहा तालुकाध्यक्ष रुद्रा पाटील भोस्कर यांनी केले आहे.