
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
भूम – राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्या स्थानिक विकास निधीतून,नगर विकास विभागाकडून व संजय गाढवे यांच्या प्रयत्नातून तयार करण्यात आलेल्या शहा वस्ती,माळी वस्ती रस्त्याचे काम जलद गतीने व उत्कृष्ट दर्जाचे झाल्याबद्दल या भागातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी सर्वांनी मिळून सदरील रस्त्याचे पूजन करत नवीन रस्त्याच्या वास्तुशांती निमित्त अन्नदान केले.आतापर्यंत प्रथमच अशा प्रकारे रस्त्याची वास्तू शांती करून अन्नदान करण्याचा उपक्रम राबविला जात असल्याने हा कौतुकाचा विषय ठरला आहे.मागील अनेक वर्षांपासून या शेतवस्तीतील नागरिकांना, शेतकऱ्यांना पावसाळ्यात चिखल तुडवत या रस्त्याने शेतात जावे लागत होते.तसेच महिला,जेष्ठ नागरिक व शाळकरी मुलांना देखील त्रास सहन करावा लागत होता.मात्र संजय गाढवे यांनी या रस्त्याच्या कामाचा शासन स्तरावर योग्य रीतीने पाठपुरावा करून हा रस्ता जलद गतीने व उत्कृष्ट दर्जाचा करण्यासाठी प्रयत्न केले.त्यामुळे या वस्ती मधील नागरिक,शेती करत असलेले शेकडो शेतकरी यांच्यात मोठ्या प्रमाणात आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.या वस्ती वरील नागरिकांनी शुक्रवारी महाप्रसादाचे आयोजन केले होते.यावेळी मा.नगराध्यक्ष संजय गाढवे,जिल्हा नियोजन समिती सदस्या संयोगिता गाढवे, शंकर गाढवे, हनुमंत गाढवे,गुरुदास नाईकवाडी,मधुकर साबळे,साहिल गाढवे,सुरज गाढवे,बालाजी अंधारे,राम बागडे,मा.नगरसेवक संजय पवार,भाऊसाहेब नाईकवाडी,सागर टकले, मेहेराजबेगम सय्यद,तोफिक कुरेशी,अमोल भोसले,सुनील माळी,शहाजी साबळे,शीतल शहा,रणजित कुंभार,आदेश माळी,सचिन माळी,मधुकर माळी,बापू माळी,सतीश माळी,अमोल माळी, गोवर्धन माळी,हनुमंत माळी,राजपाल माळी,अनिल माळी,बाळू रीटे,फारुक मोगल, यांच्यासह शेकडो शेतकरी बांधव उपस्थित होते.