
दैनिक चालू वार्ता मराठवाडा उपसंपादक -ओंकार लव्हेकर
लोहा—-जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सुगाव येथे शालेय मंत्रिमंडळ नुकतेच स्थापन करण्यात आले . मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख बी जी कापसे, शिक्षक जी .एस. मंगनाळे, किरण राठोड ,जयराम पाटील ,शिवनंदा मुदखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय मुख्यमंत्री म्हणून अक्षरा मनोहर जाधव, उपमुख्यमंत्री तथा शिक्षणमंत्री गणराज रामदास जाधव ,शालेय सांस्कृतिक मंत्री ऋतुजा शिवाजी गायकवाड ,शालेय पाणीपुरवठा मंत्री ऋषिकेश शिवराज जाधव, सहलमंत्री श्रेया मधुकर जाधव, शालेय सूचना मंत्री सुप्रिया अर्जुन कांबळे ,शालेय सहकारमंत्री सुप्रिया चंद्रकांत धंदे ,शालेय आरोग्य मंत्री समर्थ गजानन धंदे, शालेय क्रीडामंत्री गणेश संभाजी कळकेकर, शालेय शिस्तपालनमंत्री मयूर दत्ता कानगुले, शालेय वनमंत्री आदित्य शिवाजी जाधव, शालेय स्वच्छतामंत्री साईनाथ संभाजी जाधव आदीची निवड करण्यात आली. मुख्याध्यापक व शिक्षकाच्या वतीने तीन वर्गखोल्याच्या व्हराड्यांमध्ये स्वखर्चाने ऑइलपेंटनी भिंती बोलक्या केल्याबद्दल शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय पुणेबोईनवाड ,उपाध्यक्ष मधुकर पाटील जाधव यांनी अभिनंदन केले आहे.