
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद उपसंपादक- मोहन आखाडे
शहर आणि जिल्ह्याची ग्रामदैवत असलेल्या कर्णपुरा येथील तुळजाभवानीच्या मंदिराला तब्बल 350 वर्षांचा इतिहास आहे. विशेष म्हणजे, दरवर्षी नवरात्रोत्सवात 9 दिवस याठिकाणी मोठी यात्रा भरत असते. मात्र गेली दोन वर्षे कोरोनामुळे रद्द झालेली ही यात्रा यावर्षी मोठ्या उत्साहात भरवण्यात आली आहे. तर आज पहिल्याच दिवशी पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.
औरंगाबादच्या कर्णपुरा मंदिराचा एक जुना इतिहास आहे. वर्षानुवर्ष या ठिकाणी नवरात्रोत्सवात मोठी यात्रा भरते. या यात्रेत लाखो भाविकांची उपस्थिती पाहायला मिळते. औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागातील भाविक सुद्धा या यात्रेत सहभागी होतात. कर्णपुरा देवीचे दर्शन घेण्यासाठी नऊ दिवस भाविकांची प्रचंड अशी गर्दी सकाळपासून पाहायला मिळते. यावर्षी सुद्धा पहाटे तीन वाजेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
औरंगाबादकर दरवर्षी कर्णपूरच्या यात्रेची वाट पाहतात. मात्र गेली दोन वर्ष राज्यात कोरोनाची परिस्थिती पाहता ही यात्रा रद्द करण्यात आली होती. साडेतीन वर्षांचा इतिहासात पाहता आत्तापर्यंत चार वेळा ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. मात्र यावर्षी कोणतेही निर्बंध नसल्याने कर्णपुरा यात्रा मोठ्याप्रमाणात भरली आहे