
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी माण-संभाजी गोसावी
तालुक्यांतील दहिवडी येथील धर्मवीर कामगार संघटनेच्या वतीने तालुक्यांमध्ये तसेच गावोगावी मजूर कामगारांबाबत व त्यांच्या गैरसोयी समस्या अडचणी नेहमी सामोरे जाणारी माण तालुक्यांतील धर्मवीर कामगार संघटना व संघटनेमधील अध्यक्ष पदाधिकारी सर्व सदस्य यांनी आपल्या नावाचा चांगलाच नावलौकिक मान तालुक्यांमध्ये गाजविला आहे. तसेच कामगार संघटने कडूंन गोरगरीब मजुरांना एक मायेचा आधार मिळत आहे. धर्मवीर कामगार संघटनेतून आणि उपक्रम राबवून मजूर कामगारांच्या वेळोवेळी समस्या या धर्मवीर कामगार संघटनेतून दूर होत आहेत. संघटनेत मधील सर्वच कार्यकर्ते अगदी कौशल्य पूर्वक काम करत आहे. आज दहिवडी पोलीस ठाण्यांमध्ये कामगार संघटनेच्या अध्यक्ष पदाधिकारी सर्व सदस्य कार्यकर्ते यांच्या उपस्थिंतीमध्ये दहिवडी पोलीस ठाण्यांचे नुकतेच पदभार स्वीकारलेले नूतन सहायक पोलीस निरीक्षक माननीय अक्षय सोनवणे यांचे तपास कामी आलेले कोरेगाव विभागांचे उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय गणेश केंद्रे यांच्या प्रमुख उपस्थिंतीमध्ये दहिवडी पोलीस ठाण्यांत भव्य स्वागत करण्यांत आले. यावेळी अमित कुलकर्णी (अध्यक्ष) सचिन गिरीगोसावी(उपाध्यक्ष) सुमित रमेश कुलकर्णी (खजिनदार) नितेश गांधी(कार्यकर्ते) प्रकाश पुरीगोसावी (सदस्य ) सोनू धनाजी मदने(सदस्य) शंकर जाधव (सदस्य) आजी-माजी धर्मवीर कामगार संघटनेतील सर्व अध्यक्ष पदाधिकारी मित्रपरिवार आदींची यावेळी उपस्थिंती होती.