
दैनिक चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधी -विशाल खुणे.
अपहरण, भय याला रोखठोक प्रतिउत्तर म्हणुन सुप्रसिध्द कराटे प्रशिक्षक श्री अमित ठाकूर सर यांनी लेक दिननिमित्त शतकोन कराटे स्पोर्ट्स असोसिएशन च्या वतीने मुलींना दिले आत्मरक्षणाचे धडे
========================
दि 25 सप्टेंबर 2022 (मोहनवाडी पुणे)
बहुजन हिताय मुलींचे वसतिगृह मोहनवाडी, विश्रांतवाडी हे गेल्या ३३ वर्षांपासून पुण्यात कार्यरत आहे. वसतिगृहात दरवर्षी 100 विद्यार्थी राहतात. येथे दाखल झालेली सर्व मुले पुणे जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या मागास, अनाथ, गरीब, गरजू, झोपडपट्टी व दुर्गम भागातील आहेत. या मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व प्रकारच्या सेवा मोफत दिल्या जात आहेत. पुणे शहरामध्ये होत असलेल्या मुलींच्या बाबतीतल्या अनुचित घटना अपहरण यामुळे मुलींनी आत्मरक्षण कसे करावे यासाठी बहुजन हिताय मुलींचे वसतिगृह जाधवनगर येरवडा पुणे 06* मध्ये शतकोन कराटे स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे मुलींना आत्मरक्षण कसे करावे यासाठी मोफत मध्ये आत्मरक्षणाचे सेमिनार भरविण्यात आले .
वसतिगृहाच्या अधीक्षिका दीक्षा इंगळे वैशाली कुडेकर, श्वेता भंडारे व शतकोन स्पोर्ट्स कराटे असोसिएशनचे फाउंडर प्रेसिडेंट अमित ठाकूर सर, सीनियर कराटे इंस्ट्रक्टर सागर ढवळे सर व सुमित ठाकूर, विशाल परदेशी, तन्मय दिवेकर, अमर खळसोडे , निकिता गायकवाड, अक्षय कांबळे यांनी आत्मरक्षणाचे प्रत्यक्षीकरण व प्रशिक्षण दिले