दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे
देगलूर:आज देगलूर येथे काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो तयारीसाठी यात्रेच्या पूर्वतयारीसाठी महाराष्ट्रातील देगलूर बिलोली विधानसभा मतदार संघातून भारत जोडो यात्रा जात असल्याने त्याच्या पूर्व नियोजनाची बैठक आज देगलूर येथे शासकीय विश्रामगृहात माजी मंत्री डीपी सावंत साहेब व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आमदार अमर भाऊ राजूरकर,आमदार जितेश भाऊ अंतापुरकर,वरिष्ठ काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा डॉ.मीनल ताई पाटील खतगावकर यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थित होते
