
दैनिक चालु वार्ता खानापुर सर्कल प्रतिनिधि- मानिक सुर्यवंशी
महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर वसलेला हा देगलूर तालुका असून तेलंगणा, महाराष्ट्र व कर्नाटक या भागातील पारंपरिक सण म्हणून महिलाचा आनंदाचा उत्सवाचा सण म्हणून नवरात्र महोत्सवामध्ये येणारा बदक्कम्मा हा सण नरंगल येथे अतिशय उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. गावातील सर्व जाती धर्मातील महिला एकत्र येऊन पारंपारिक पद्धतीने गाणे गायले जातात व गाव शेजारी असलेला नदी किंवा तलाव यामध्ये फुलांचा किंवा पर्यावरण पूरक अशा कागदी बदक्कमाचे विसर्जन केला जातो. या निमित्ताने महिलांमध्ये विचाराचे देवाण-घेवाण होत असून त्याला प्रोत्साहन म्हणून नरगंल च्या सरपंच प्राध्यापक सौ शोभाताई करणे यांच्या हस्ते सर्वांना साडी काकण, चोळी, वितरण करण्यात आले याप्रसंगी गावातील बहुसंख्य महिला उपस्थित होते.