
दैनिक चालू वार्ता हिमायतनगर प्रतिनिधी:-राम चिंतलवाड
तालुक्यात मोठीवस्ती आसणारे मौजे सिरंजनी गावात मागिल महिन्यांतील २८तारखेला गावातील चार ते पाच लोकांचे चोरांनी घरे फोडूनआपला मोर्चा गावातील जागृत देवस्थान असणारे मारोती मंदिर या ठिकाणी वळविला व तेथे असणारी दानपेटी फोडून त्यातील काही चांदी व रोख रक्कम घेऊन चोर पसार झाले व त्यांच्या नंतर मंदिर कमिटीने सविस्तर गून्हा दाखल केलाआसता,अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे भोकर यांनी सिरंजनी येथिल मंदिरात भेट देऊन देवस्थान कमिटीसी संवाद साधला व चोरीचा तपास वेगाने केला जाईल असे आश्वासन दिले होते.
सिरंजनी चोरीचा तपास चालू आसतांना विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील मौजे बिटरगाव येथे सराईतपणे चोरी करून चोर पसार होत असतांना मौजे वारंगटाकळीच्यां पुलावर पोलीसांनी सापळा रचून चोरांना पकडण्यात यश मिळाले.या चोरीतील चोरांचा पोशाख व सिरंजनी येथिल हनूमान देवस्थानांतील चोरांचा पोशाख व ईतर बाबींचा विचार करून हिमायतनगर येथील पोलिस निरीक्षक बी.डी.भूसनुर यांच्या मार्गदर्शनाखाली व सिरंजनी चोरीचे तपास अधिकारी साहाय्यक पोलीस निरिक्षक नंदलाल चौधरी व ईतर पोलिस कर्मचारी यांचे पथक मौजे सिरंजनी चोरीच्या तपासणीसाठी बिटरगाव पोलीस स्टेशन येथे रवाना करत असल्याचे पोलीस निरीक्षक बी.डी.भूसनुर यांनी आमचे प्रतिनिधीसी बोलतांना सांगितले आहे.