दैनिक चालू वार्ता कंधार ग्रा प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
सिरसी बु. :– सिरसी बु. ता. कंधार येथे मल्लीनाथबाबा दुर्गा माता मंडळ येथे दि.२ आॅक्टोबर रविवारी सायंकाळी ठिक ७:०० वाजता दुर्गा मातेची आरती झाल्यानंतर भक्त मंडळीसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच रात्री ठिक ८:०० वाजता. ह.भ.प.प्रविण रौतुलवाड पार्डीकर श्री. हनुमान भक्त भजनी मंडळी पार्डी (हि.न.) विरुद्ध द.भ.प.पांडुरंग गादगे किवळेकर संत बाळगीर महाराज भजनी मंडळी किवळा ता. लोहा यांचा भजनाचा जंगी सामना आयोजित केला आहे. तरी गावातील तसेच परीसरातील भक्त मंडळींनी महाप्रसाद व भजनाच्या जंगी सामन्याचा लाभ घ्यावा असे मल्लिनाथबाबा दुर्गा माता मंडळ सिरसी बु.चे पदाधिकारी व समस्त गावकरी मंडळी सिरसी बु. यांनी कळविले आहे.
