
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे.
देगलूर :महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने दिनांक 2 ऑक्टोबर 2022 वार रविवार रोजी जिल्हास्तरीय गुरूगौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन*.देगलूर तालुक्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनींना नम्र आवाहन करण्यात येते की तसेच आपणास आग्रहाचे निमंत्रण देण्यात येत आहे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा शाखा नांदेड च्या वतीने भव्य दिव्य पुरस्कार सोहळा व मोठ्या शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे तरी या शिक्षण परिषदेच्या माध्यमातून आपल्या देगलूर तालुक्यातील तीन आदर्श शिक्षक बंधू भगिनीची तसेच एक आदर्श उपक्रम शाळेची अशा चार पुरस्काराचे निवड निष्पक्षपातीपणाने केलेली आहे तरी आपल्या आदर्श शिक्षक शिक्षिका बंधू-भगिनींचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी आपण सर्व देगलूर तालुक्यातील शिक्षकांनी दिनांक 2 ऑक्टोबर 2022 रोजी दुपारी बारा वाजता कुसुम सभागृह व्हीआयपी रोड नांदेड येथे सर्वांनी उपस्थित रहावे ही सर्वांना नम्र विनंती
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
🌹1)प्राथमिक शिक्षक :-श्री. साखरे विश्वनाथ शिवाजीराव.शाळा :-जि. प. प्रा. शाळा मंडगी केंद्र :-नरंगल तालुका :- देगलूर
🌹2) प्राथमिक शिक्षिका :-सौ.कौशल्या बाबुराव बिरादार.. शाळा :-जि. प. केंद्रीय प्रा. शाळा होट्टल
🌹3)माध्यमिक शिक्षक :-श्री. दोमाटे उमेश मनोहरराव… जि. परिषद हायस्कूल करडखेड तालुका :- देगलूर
🌹4)उपक्रमशील शाळा :- जि. परिषद प्राथमिक शाळा तडखेल केंद्र :- वन्नाळी,तालुका :- देगलूर