
दैनिक चालू वार्ता शिराढोण सर्कल प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
उस्माननगर ते नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील हडको नजीक गोविंद गार्डन येथे दि.१ ऑक्टोबर रोजी पहाटे पाचच्या दरम्यान दुचाकीसमोर डुकर आल्यामुळे दोन्हीची धडक होऊन अपघात झाल्याने या आपघातात गंभीर झालेले पोखरभोसी ता.लोहा येथील डाँ.अविनाश डांगे (वय २८ वर्षे ) यांचा जाग्यावरच र्दुदैवी मृत्यु झाल्याची घटना घडली.
लोहा तालुक्यातील पोखरभोसी येथील डॉक्टर अविनाश विक्रम डांगे हे दि १ऑक्टोबर रोजी पहाटे पाचच्या दरम्यान गावाकडून नांदेड कडे दुचाकीवरुन क्रं ( एम.एच.२६ बी.आर.३१९४) निघाले असता उस्माननगर रोडवर गोविंद गार्डन हडको याठिकाणी त्यांच्या दुचाकासमोर सुसाट डुक्कर आल्याने दोन्हीची धडक होऊन अपघात झाल्यामुळे ते गंभीर जखमी झाल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला.घटनास्थळी असलेल्या लोकांनी व त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना विष्णुपुरी येथील दवाखान्यात नेऊन पुढील प्रक्रिया पुर्ण करुन मृतदेह त्यांच्या गावी पोखरभोसी येथे आणण्यात आला. सायंकाळी डाँ. अविनाश डांगे यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.नातेवाईकांनी दिलेल्या माहिनुसार डॉक्टर अविनाश डांगे यांचे वडील आजारी असल्यामुळे ते औरंगाबाद येथील दवाखान्यात उपचार घेत होते त्यांना भेटण्यासाठी अविनाश डांगे हे गावाकडून सकाळी दि.१ ऑक्टोबर रोजी पहाटे पाचच्या सुमारास मराठवाडा ( हायकोर्ट ) रेल्वेगाडी पकडण्यासाठी किवळा मार्गे नांदेड कडे जात होते. मोटरसायकलवरुन जात असताना उस्माननगर रस्त्यावर गोविंद गार्डन हडको याठिकाणी त्यांचा अपघात झाला व यांमध्ये जागीच त्यांचा मृत्यू झाला.
डॉ.अविनाश डांगे यांचे पाच महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते लोहा तालुक्यातील भोपाळवाडी( कलंबर) येथे त्यांचा दवाखाना होता.डांगे हे अतिशय हुशार व मनमिळाऊ स्वभावाचे होते.कलंबर परिसरातील रूग्णांची जन सेवा हिचं ईश्वर सेवा म्हणून ते सेवा करत होते त्यांच्या पश्चात पत्नी,आई, वडील, बहीण,भाऊ असा परिवार आहे.पोखरभोसी पंचक्रोशीतील गोरगरिबांचे मायबाप म्हणुन परिचित होते. संजय गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कलंबर या शाळेचे ते विद्यार्थी होते. त्यांच्या या अकाली निधनामुळे मुख्याध्यापक,वर्गशिक्षक व गावातील नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर पाचच्या दरम्यान पोखरभोसी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले