
दैनिक चालू वार्ता रायगड म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा मोहिम, स्वच्छता सेवा मोहिम राबवित म्हसळा तहसील कार्यालय परिसर स्वछता करून सेवा दिन साजरा करण्यात आला या वेळी महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्रीजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पित करण्यात आले. म्हसळा तहसीलदार मा. समीर घारे साहेब , मा. धर्मराज पाटील महसूल तहसीलदार .मा. तेलंगे निवासी तहसीलदार, माने तात्या, पाटील तात्या, भगत तात्या कर्मचारी वर्ग उपस्थित होता. गोंडघर ग्रामपंचायत मध्ये महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्रीजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा मोहिमे अंतर्गत स्वच्छता सेवा करून मोहिमेचा समारोप करण्यात आला या प्रसंगी ग्रामसेवक श्री डी. एच गमरे सरपंच श्री लहू गणपत तुरे सदस्य व तसेच ग्रा. प.कर्मचारी काशिनाथ नाईक ग्रामस्थ मोठ्या संख्येने स्वच्छता अभियाना मध्ये सहभागी होते.या वेळी स्वच्छता व पर्यावरण संरक्षण शपथ घेण्यात आली. न्यू इंग्लिश स्कुल म्हसळा या ठिकाणी हि महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्रीजी यांच्या प्रतिमेस मा.हाके सर मुख्याद्यापक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली या वेळी. श्री दिपक सूर्यवंशी, श्री नेताजी गायकवाड श्री उद्धव खोकले, श्री एकनाथ पाटील, श्री कामडी,श्री दिलीप भायदे, श्री अस्वले, श्री गुलाबसिंग गावित, श्री देवा, श्री जंगम हे उपस्थित होते. रा. जि. प. शाळा बनोटी येथे ही महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्रीजी यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली मुख्याधिपिका श्रीमती तृप्ती सावंत व विद्यार्थी उपस्थित होते.रा जि प शाळा आगरवाडा येथे जयंती साजरी करण्यात आली श्री गर्जे सर. श्री भोसले सर, श्रीमती भोसले मॅडम हे उपस्थित होते जि प शाळा बागाचीवाडी महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्रीजी यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली मुख्याद्यापक श्री सहाने सर समाजसेवक श्री राम पारदूले हे उपस्थित होते आदर्श शाळा खरसई येथे महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्रीजी यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून म्हसळा गटशिक्षण अधिकारी मा संतोष दौड, खरसई ग्रामपंचायत चे सरपंच श्री निलेश मांदाडकर, श्री पशुराम मांदाडकर शिक्षक श्री जयसिंग बेटकर होते या वेळी तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शांत नंबर आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला खरसई हायस्कुल येथे जयंती पारपडली मुख्याद्यापक श्री. मुलानी श्री वसंत सातुपुते शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होता