दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- गणेशोत्सवाची सांगता नुकतीच मोठया उत्साहात पार पडली असता दहा दिवसांत मेहनत घेतलेल्या व दमलेल्या गणेश मंडळ कार्यकर्त्यांची नांदगाव खंडेश्वर पोलीस प्रशासनाच्या वतीने ठाणेदार विशालजी पोळकर यांनी खास दखल घेतली.ठाणेदार विशालजी पोळकर यांच्या अनोख्या उपक्रमाने नागरिकांची मने जिंकून घेतली.त्यांनी नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशन परिसरात प्रथमच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान सोहळा पुरस्कार वितरीत करण्यात आला.त्यांनी प्रथमच नांदगाव खंडेश्वर पोलीस प्रशासनाच्या वतीने सुरू केलेल्या या उपक्रमाची शहरातील सर्व मंडळात व कार्यकर्त्यांमध्ये सध्या जोरात चर्चा सुरू आहे.शहरातील प्रत्येक गणेशोत्सव मंडळांनी शासनाच्या नियमांचे पालन करत कुठलाही अनुचित प्रकार घडू दिला नाही व पोलीस प्रशासनाला सहकार्य केल्यामुळे शहरातील गणेशोत्सव शांततेत पार पडला असल्यामुळे यावेळी धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड,अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ,उपविभागीय पोलीस अधिकारी सूर्यकांत जगदाळे,तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी,माजी सैनिक मधुकर पातोंडे या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गणेशोत्सव मंडळांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
शहरातील प्रथम पुरस्कार राधे गणेश उत्सव मंडळ,द्वितीय पुरस्कार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ,तृतीय पुरस्कार शिवाजी गणेश मंडळ यांच्यासह प्रोत्साहनपर सन्मान करण्यात आले.तर ग्रामीण भागातील प्रथम पुरस्कार गणेश उत्सव मंडळ कंजरा,द्वितीय पुरस्कार गणेश उत्सव मंडळ शिवनी रसूलापूर यांना देण्यात आले.शहरातील सर्व सार्वजनिक कार्यक्रम अशाच प्रकारे शांतता-सुव्यवस्थेच्या नियमांचे पालन करत कार्यक्रमात हिंदू-मुस्लिम भावांनी नाते टिकून ठेवावे असे आवाहन पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील नागरिकांना केले आहे.बऱ्याच ठिकाणी गणेश उत्सव,नवरात्र यांसारख्या उत्सवा दरम्यान कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्या घटना घडत असतात ज्यामुळे दंगली घडून येतात मात्र;ठाणेदार विशालजी पोळकर यांनी तालुक्यातील गणेश उत्सव मंडळांना गणेश उत्सव हा अत्यंत शांत पद्धतीने साजरा केला.विसर्जनाच्या दिवशी विना गुलाल उधळता विसर्जन सोहळा साजरा करावा व तसेच मुस्लिम बांधवांनी गणेश उत्सव मंडळांचा सत्कार घ्यावा असे आवाहन या सोहळ्या दरम्यान केले.या आव्हानाला तालुक्यातील नागरिकांनी उस्फुर्त असा प्रतिसाद देत हिंदू-मुस्लिम एकतेचे उत्तम असे उदाहरण दाखविले आहे.जागो-जागी मुस्लिम बांधवांनी गणेश उत्सव विसर्जन सोहोळ्यात सहभागी असणाऱ्या लोकांचे सत्कार घेतले.त्यामुळे संपूर्ण तालुक्यात कुठेच अनुचित प्रकारा घडला नसल्याने ठाणेदार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.
ठाणेदार विशालजी पोळकर या उपक्रमामागील संकल्पना विशद करताना म्हणाले,सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे फक्त त्या दहा दिवसापूरते नसते.मंडळात निष्ठेने,निस्वार्थीपणे काम करणारे कार्यकर्ते हे वेळ पडल्यावर समाजातील विविध घटकांच्या मदतीलाही सर्वप्रथम धावून जातात.तरीही त्यांच्याकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन हा सरसकट सकारत्मक नसतो.म्हणून त्यांच्या श्रमाला कष्टाला मानसन्मान मिळावा,त्यांच्या कष्टाप्रती कृतज्ञता व्यक्त व्हावी म्हणून हा उपक्रम सुरु केला,असे ते म्हणाले.
या कार्यक्रमात आमदार प्रताप अडसड यांनी बंदोबस्तात असणाऱ्या पोलीस बांधवांसाठी एका वेगळा हॉल,हॉलीबॉल ग्राउंड,व्यायामशाळा,शहरातील प्रमुख महामार्गावर मोडकळीस आलेल्या पोलीस चौकीच्या बांधणीसाठी लागणारा निधी उपलब्ध करून द्यावा अशा अनेक प्रकारच्या मागण्या केल्या आहेत.या कार्यक्रमादरम्यान तालुक्यातील गणेश उत्सव मंडळ,दुर्गोत्सव मंडळ व मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते.
