
दैनिक चालु वार्ता पालघर प्रतिनीधी: –सौरभ कामडी
राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा जन्मदिवस २ ऑक्टोबर हा ‘स्वच्छता दिन’ म्हणून संपूर्ण भारत देशभर साजरा केला जात असून, जव्हार तालुक्यातील कोरतड या गावातील महिला व नागरिक एकत्र येऊन हातामध्ये झाडू घेऊन संपूर्ण गावाची स्वच्छता करून गाव स्वच्छ करून स्वच्छतेचा संदेश दिला. महात्मा गांधी यांनी खेड्याकडे चला असा संदेश दिला असून आज खेडे स्वयंपूर्ण होत असल्याचे चित्र बघायला मिळत आहेत.
तसेच गावांमध्ये दुर्गंधी पसरू नये व आपलं गाव स्वच्छ राहावे म्हणून एक दिवस तरी गावातल्या लोकांनी आपल्या गावाची स्वच्छता करावी. जेणेकरून आपल्या गावात कुठल्याही प्रकारचा कचरा होणार नाही. म्हणून परिसरातील संपूर्ण रस्ते, गल्लीबोळ झाडून गाव स्वच्छता अभियान रबविले.
भरत गोविंद : ” स्वच्छता ज्याच्या घरी…आरोग्य नांदे त्याच्या घरी… या प्रमाणे आपली व आपल्या परिषराची स्वच्छता ठेवावी..”