
दैनिक चालू वार्ता मराठवाडा उपसंपादक-ओंकार लव्हेकर
राष्ट्रीय समाज पक्षाच्या नांदेड दक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी कंधार येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक भगवान शंकरराव मुंढे यांची नेमणूक करण्यात आली आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री शेवते, माजी राष्ट्रीय अध्यक्ष सिद्धप्पा अक्कीसागर, व राष्ट्रीय संघटक गोविंदराव सुरनर यांच्या उपस्थितीत नांदेड येथे पार पडलेल्या पक्षाच्या मराठवाडा स्तरीय मेळाव्यात भगवान मुंढे यांना नियुक्ती पत्र देऊन पक्षाची धुरा त्यांच्या खांद्यावर सोपवली आहे.
भगवान मुंढे यांनी आत्तापर्यंत शैक्षणिक कार्यासोबत सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम केल्यामुळे त्यांना विविध क्षेत्रातील अनुभव आहे.यापुर्वी त्यांनी ग्रामपंचायत सदस्य, सेवा सहकारी सोसायटी चेअरमन, तसेच विविध पक्षांच्या पदावर काम केले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांशी संपर्क असल्याने त्यांचा पक्षवाढीसाठी फायदा होणार आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल डॉ.दिनकर जायभाये, प्रा.सुभाष वाघमारे, रासप तालुकाध्यक्ष संजय जायभाये, शिवाजी गुडसूरकर, सुनील पाटील,राम बनसोडे, डॉ. विठ्ठल खाडे, विनायक मोरे,हनुमंत मुसळे इ.नी अभिनंदन करुन भावी कार्याला शुभेच्छा दिल्या.