
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
अहमदपूर
श्री पांडुरंग निवासी मूकबधिर विद्यालय निडेबन उदगीर या शाळेत युवा उद्योजक बालाजी अर्बन को ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष व उमा महेश पेट्रोल पंपाचे व लक्ष्मी वेअर हाऊस चे मालक सतत सामाजिक कार्यामध्ये भाग घेणारे बँकेच्या माध्यमातून गोरगरीब सर्व सामान्याच्या अडचणी दूर करणारे श्री.व्यंकटेशजी अनिलजी चिद्रेवार सावकार यांच्या वाढदिवसाच्या व विजयादशमीच्या (दसरा) निमित्ताने व्यंकटेशजी सावकार यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी एक गरजेची वस्तू भेट या स्वरूपामध्ये भाजीपाला,अंडी,दुध, इतर वस्तू ठेवण्यासाठी म्हणून ” फ्रीज ” देण्यात आले. सर्वसामान्य लोकांना कोणी मदत करत पण समाजामध्ये एक विशेष व्यक्ती समजल्या जाणाऱ्या मूकबधिर विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी म्हणून असे सामाजिक कार्य व्यंकटेशजी सावकार यांच्या हातून घडावे हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करण्यात आली.सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांचे आभार मानले. या कार्यक्रमास उपस्थितामध्ये श्री.आशिष डोईजोडे,श्री.मनोज नेत्रगावे,श्री जगदीश पाटील संस्था पदाधिकारी श्री .विकास तपशाळे व शाळेतील कर्मचारी श्री.पराड सर श्री.म्हेत्रे सर,देवकत्ते,पिंपळे,केंद्रे,राठोड,आडे,पवार, सुत्रसंचालन आलट सर यांनी केले.