
दैनिक चालु वार्ता मोखाडा -सौरभ कामडी
सख्खा लहान भाऊच ठरला पक्का वैरी,मोठ्या भावाचा कोयत्याने खून
दि.७ आँक्टोंबर २०२२.
जव्हार तालुक्यातील न्याहाळे बुद्रक ग्रामपंचायत हद्दीतील चामीलपाड्यात शुक्रवारी सकाळी १०च्या सुमारास सख्या लहान भावानेच मोठ्या भावाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पंकज सोन्या वाजे(वय २१) हा शुक्रवारी वसईला कामाला जायला दुचाकी वरुन निघाला असताना लहान भावाने त्याला थांबवुन त्याच्या गळ्यावर कोयत्याने वार करुन त्याचा खून केला.भाऊ रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहून आरोपी निवृत्ती वाजे हा जंगलात फरार झाला.
ह्या घटनेची माहिती मिळताच जव्हार पोलीस घटनास्थळी पोहचून गुन्ह्याचा पंचनामा केला .मृतदेह शवविच्छेदनासाठी जव्हारच्या पतंगशहा कुटीर रुग्णालयात पाठवण्यात आला होता.ह्या खुनाचा अधिक तपास जव्हार पोलिस उपविभागीय अधिकारी प्रशांत परदेशी,पोलिस निरीक्षक आप्पासाहेब लेंगरे करीत आहेत.
पंकज सोन्या वाजे हा वसई तालुक्यातील वालीव हद्दीतील गौराईपाड्यात भाड्याच्या खोलीत पत्नी व मुलासोबत राहत होता.तो तिथे मिळेल ते बिगारी काम करायचा.नवराञीत ४ आँक्टोंबरला मंगळवारी चामीलपाड्यात देवीला केलेला नवस फेडण्यासाठी व गावावरुन काही धान्य आणण्यासाठी आला होता. चामीलपाड्यात त्याचा लहान सख्खा भाऊ आरोपी निवृत्ती वाजे व आई राहते.गुरुवारी राञी भाऊ वसई वरुन आल्याने हे दोघे सख्खे भाऊ जोडीने राञी वांगणपाड्याच्या नदीवर खेकडी पकडायला गेले होते.बाईक वांगणपाड्यात ठेवुन खेकडी पकडल्या. शुक्रवारी खेकडी बनवल्या होत्या.मोठा भाऊ पंकज लहान भावाला कामासाठी वसईला येण्याचा आग्रह करत होता.परंतु लहान भाऊ निवृत्ती तिकडे कामासाठी येण्यास तयार नव्हता.परंतु शुक्रवारी पंकज वसईला निघाल्यावर त्याच्याबरोबर जायला तयार झाला होता.मात्र भावाला पुढे दुचाकीवर काढून चामील पाड्यातील पाण्याच्या टाकीजवळ निवृत्ती कोयता घेऊन दबा धरुन बसला होता.त्याने भावाला तिथे थांबवुन त्याच्याशी बोलत असताना निवृत्तीने पंकजच्या गळ्यावर कोयत्याने वार केले.तो रक्ताच्या थारोळ्यात पडताच आरोपी निवृत्ती सोन्या वाजे(वय १९) हा खून करुन जंगलात फरार झाला.अद्याप खूनाचे नेमके कारण कळाले नसुन जव्हार पोलिस खूनाचा अधिक तपास करीत आहेत.
मयत पंकज सोन्या वाजे(वय२१) यांच्या पश्चात्य त्याची पत्नी, ७ महिने ११दिवसाचा मुलगा व आई अशा परिवार आहे.