
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे.
देगलूर( दि.०९) देगलूर तालुक्यातील कोकलगाव येथील अमृत मोहत्सवानिमीत्त कोकलगाव पाझर तलाव हे मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेतून हे काम घेण्यात आले असून या कामाला सुरुवात इ.स. दि.१२ मे २०२२ ते इ.स.दि.१८ जुलै २०२२ या कालावधीत पुर्ण करण्यात आले. या कामाला लागणारे अंदाजीत रक्कम रु.४१,६१,२४७ एवढी होती.परंतू या पाझर तलावाचे काम एकदम निकृष्ट दर्जाचे झाले असून या तलावाच्या मध्यभागापासून मोठमोठ्या भेगा पडल्याचे निदर्शनास आणून दिले असताना सुद्धा या कामावरील गुत्तेदार अरेरावीची भाषा वापरत असून या कामावरील अभियंता नॉट रिचेबल आहेत.
कोकलगाव पाझर तलावातील निकृष्ट दर्जाच्या कामाची बातमी प्रकाशीत करताच या कामावरील गुत्तेदार व सहाय्यक अभियंता तरोळे यांनी आपल्या कामावरील कर्मचाऱ्यांना पाठवून थुकपॉलीश करण्यास सांगितले.या कामावरील कर्मचारी मंगेश दिसले यांच्याशी या कामाविषयी माहिती विचारली असता उडवाउडवीचे उत्तर देत या पाळूवरील आम्ही फक्त झाडे तोडलेली आहे, हे भेगा नैसर्गीक रित्या पडल्या असून आम्ही काहीच करू शकत नाही असेच बोलत होते,परंतू लगेच या भेगा बुजविण्यासाठी ट्रकटरच्या सहाय्याने त्या भेगामध्ये मुरुम टाकून थुकपॉलीश करीत आहेत.या पाझर तलावाला शासनाने एवढी मोठी निधी उपलब्ध करून देऊन सुद्धा निकृष्ट दर्जाचे काम करीत आहे याला जबाबदार कोण ?गुत्तेदाराच्या कामाची कालावधी संपली असता आज कोणत्या पद्धतीने काम चालू आहे ? गुत्तेदार व सहाय्यक अभियंत्ता यांच्या संगनमताने हे काम चालू आहे का?
शासनाने या निकृष्ट दर्जाच्या कामाची पाहणी करून तात्काळ कार्यवाही करण्यात यावी असे आवाहन या भागातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी वर्ग करीत आहेत.