
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
इंदापूर शहरामध्ये सामाजिक कार्य करणारे आणि विविध सामाजिक संघटनेच्या कार्यातून आपली ओळख निर्माण करणारे युवक स्वप्निल गदादे यांची माळी महासंघ इंदापूर तालुका युवक आघाडीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
स्वप्निल गदादे यांनी आजपर्यंत अनेक विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत.गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी ते नेहमी अग्रेसर असतात.आपला वाढदिवस त्यांनी कधीही मोठ्या धुमधडाक्यात साजरा न करता त्यांनी विविध सामाजिक संस्था व अनाथ आश्रमातील मुलांना शालेय,जीवन उपयोगी वस्तूंचं वाटप करून केला आहे.याच त्यांच्या कार्यासाठी विविध सामाजिक संघटनांनी त्यांचा गुणगौरव केलेले आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अरुण तिखे, प्रदेश महासचिव चंद्रकांत वाघोले, अण्णा गायकवाड, मुंबई हायकोर्टाचे नामांकित ॲड. नितीनजी राजगुरू,झगडेवाडी ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच बाळासाहेब झगडे,सोमा रासकर, पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष विकास शिंदे,पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडी कार्याध्यक्ष करण झगडे, इंदापूर शहर अध्यक्ष शांताराम बोराटे यांनी अभिनंदन केले आहे, तसेच इंदापूर तालुक्यातील युवक वर्गातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.