
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -कवि सरकार इंगळी
इंगळी गावातील पंचगंगा नदीत काही शेतकरी गवत कापणीसाठी नदी किनारी गेले असता त्यांना नदीच्या काठावर मगर दिसछन आली असता त्यांनी आजूबाजूच्या शेतकरी यांना बोलावून मगर दाखवली.
नदीच्या पलिकडील तिरावर रूई गावचे शेतकरच यांनाही सदर मगरीचे दर्शन झाले.रोज बरेच शेतकरी सकाळी लवकर गवत कापणीसाठी जात असतात.तसेच मासे धरणेसाठी लोक जात असतात.त्यामुळे मिठारी शेत ते सांगले शेत या भागात सदर मगरीचा वावर असलेने शेतकरीवर्ग यांनी सावधाणता बाळगणे गरजेचे आहे.
सदर मगरीचे गावातील काही पत्रकारांनी मगरीचे चित्रीकरण केले आहे. प्रथमच सदर भागात मगर दिसून आलेने शेतकरी ,मासे मारी करणारे लोक गवत कापणीसाठी जाणारे शेतकरी यांच्यात मात्र मोठ्या प्रमाणात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.