दैनिक चालू वार्ता कंधार ग्रा प्रतिनिधी- बाजीराव पाटील गायकवाड
कंधार :- कंधार तालुक्यातील शेतकरी वर्ग सरकार व पिकविमा कंपनीच्या मदतीची वाट पाहत आहेत. दिवाळी अवघ्या दहा बारा दिवसावर आली आहे. सरकारने फक्त घोषणा केली आहे, परंतु आता पर्यंत शेतकऱ्यांना मदत केंव्हा भेटेल हे काहीही जाहीर केले नाही. त्यामुळे सरकार मायबाप कंधार तालुक्यातील शेतकर्यांना लवकरात लवकर मदत देऊन आमची दिवाळी साजरी करावी कारण पावसामुळे सर्व प्रकारचे पिके नष्ट झाली आहेत. सोयाबीन कापायला महाग झाले आहे, त्यातच वरून पाऊस पडतो आहे आलेले सोयाबीन, कापूस, भाजीपाला पावसामुळे पुर्णपणे खराब होते आहे आणि कापणी व काढणी करण्यासाठी पाऊस अडचण करीत आहे. तेव्हा सरकार मायबाप दिवाळीच्या अगोदर शेतकर्यांना पिकविमा व पिक नुकसान भरपाई देण्याची मागणी कंधार तालुक्यातील शेतकर्यांनी केली आहे.
