
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
मराठवाड्यात प्रसिद्ध असलेला लोहा येथील आठवडी जनावरचा बाजार सुरू करण्याची मागणी शेतकरी व व्यापाऱ्यांनी लोहा तहसिलदार व न.पा. चे मुख्याधिकारी यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.
पुढे निवेदनात असे नमूद केले की,
लोहा येथील नगरपालिकेच्या वतीने दर मंगळवारी जनावराचा आठवडी बाजार प्राचीन काळापासून भरतो. या बाजारात तालुका जिल्हा व मराठवाड्यातील अनेक शेतकरी व्यापारी येतात तसेच अनेक छोटे-मोठे उद्योग व्यवसाय ही चालतात सध्या लंपी आजाराचे कारण सांगून लोहा येथील आठवडी बाजार गेल्या दीड महिन्यांपासून
बंद करण्यात आला आहे लोहा शहर तालुक्यात कुठेही लंपीचे जनावरे आढळून आले नाहीत.
लोहा येथील जनावराचा आठवडी जनावरांचा बाजार बंद असल्यामुळे शेतकरी , कष्टकरी , व्यापारी यांचे फार मोठे नुकसान होत आहे.
तेव्हा प्रशासनाने लोहा येथील आठवडी जनावरांचा बाजार सुरू करून गोरगरीब , शेतकरी , कष्टकरी यांना न्याय द्यावा अशी मागणी अशी मागणी शेतकरी व व्यापारी यांच्या निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनावर पिंटू भैया यादव ,राहूल पाटील ससाणे,रवि चंदेवाड चंद्रकांत पोले,पवन घुगे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.