
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद उपसंपादक -मोहन आखाडे
युवा लेखक कवी दत्तात्रय खुळे ची आंतराष्ट्रीय पर्यावरण बहुउद्देशीय संस्था जिल्हा युवा अध्यक्ष पदी नियुक्ती क रण्यात आली . अनेक साहित्य संस्थेत ते काम करत आहेत . विविध राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना मिळालेले आहे सामाजिक , साहित्य चळवळीत सक्रिय असलेले व्यक्तिमत्व , समाजभूषण , काव्यभूषण अशा अनेक पुरस्कारांनी सम्मानित करण्यात आलेले आहे . यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली .
आपल्या लेखणीतून पर्यावरण विषयी जनजागृती मांडण्याचे काम करणार असे त्यांनी नमूद केले . वृक्ष रोपण, वृक्ष संवर्धन
प्लास्टिक मुक्त भारत अशा अनेक चळवळी हाती घेणारी पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था आज अनेक देशांमध्ये कार्य करत आहे
त्यांच्या निवडीबद्दल संस्थापक आंतराष्ट्रीय अध्यक्ष देवा तांबे , उपाध्यक्ष सुहासिनी म्हाळस्कर , सचिव सौरभ हजारे ,दीपक काळे तसेच अवजीनाथ सेवा संघाचे अध्यक्ष राजेंद्र करपे , मीडिया विभाग प्रमुख मोहन आखाडे , सर्व सेवा संघाचे पदाधिकारी अन समाजबांधव आणि
समस्त तळणी ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केले .