
दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
जव्हार:- जव्हार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आप्पासाहेब लेंगरे यांनी जव्हार पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर १८९/२२ भारतीय दंड संहिता कलम ३८९,३४ प्रमाणे गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून नमूद इतर आरोपीकडून इतर मालमत्तेचे ०४ गुन्हे उघडकीस आणल्याने या केलेल्या कामगिरीची प्रशंसा म्हणून पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
१८ लाखांचा मुद्देमाल जप्त जव्हार येथे एअरटेल कंपनीच्या मोबाईल टॉवरच्या बीटीएस कार्डची लाखो रुपयांची चोरी झाल्याची फिर्याद इंडस टॉवरचे फिल्ड ऑफीसर रिकेश ठाकरे यांनी ३ ऑगस्ट रोजी नोंदविली. एअरटेल कंपनीचे एबीआयएचे तीन बीटीएस कार्ड,एएसमआयचे १ बीटीएस,तर व्हीआय कंपनीचे ६ आरयूएस ०२ बीओचे बीटीएस कार्ड असे वर्णनाचे एकूण १ लाख ७५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता.या प्रकरणी जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या चोरीचा सुगाव लावण्यासाठी जव्हार पोलिसांनी जव्हारचे पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आप्पासाहेब लेंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोरीचा तपास लावला आहे.त्यामुळे त्यांचा पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी जिल्हास्तरावर प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.