
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे.
देगलूर:देगलूर बिलोली मतदारसंघातील विविध प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन ते प्रश्न निकाली काढण्यासाठी आमदार जितेश अंतापुरकर यांनी त्यांना साकडे घातले. यावेळी त्यांनी निवेदन सादर करून मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा केली.देगलूर तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान आठशे मिलीमीटर असून सप्टेंबरच्या पूर्वीच पावसाने सरासरी ओलांडलेली आहे. तालुक्यात दोन ते तीन वेळेस अतिवृष्टी झाल्यामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील माती सुद्धा खरडून गेल्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे.मात्र, प्रशासनाने ४० ते ६० टक्केच नुकसान झाल्याच्या अहवाल दिल्याने शेतकऱ्यांना दुष्काळापोटी मिळणाऱ्या रक्कमेतही मोठी घट झाली आहे. दसऱ्याच्या तोंडावर मिळणारी ही रक्कम दिवाळीच्या तोंडावर सुद्धा मिळायला तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्यात संताप व्यक्त केला जात असल्याची बाब त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.शेतातील नुकसान उंबरठा उत्पन्नाच्या कितीतरी कळवला नसल्याने ती रक्कमही शेतकऱ्यांच्या हातात किती पडेल? याबाबतही शेतकऱ्यांच्या मनात साशंकता आहे.
शिक्षक संघटना व सामाजिक संघटनांनी
तालुक्यातील शून्य ते वीस पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून तो निर्णय मागे घ्यावा अशी मागणी अनेक केल्यामुळे याकडेही मुख्यमंत्र्यांनी नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वावर हा निर्णय मागे घेऊन दिलासा द्यावा, अशी मागणीही आमदार जितेश अं यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.या सर्व मागण्यांच्या वर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक होकार दर्शविला असून देगलूर बिलोली मतदारसंघातील रखडलेल्या विविध प्रश्नाबाबतही त्यांनी येणाऱ्या काळात ते प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिल्याचे आमदार अंतापूरकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.