
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
फसवणूक हि कोणत्याही प्रकारची असली तरी अंतिमतः ती आपल्यासाठी त्रासदायक असते . कोणत्याही प्रकारच्या फसवणूकीला आपला निष्काळजीपणा जबाबदार असतो .आपण जागृत नसणं हेच मुख्य कारण असते.कारण आपण फार काही खातरजमा न करता क्षणात विश्वास ठेवतो आणि परिणाम स्वरूप आपण फसले जातो . शक्यतो जास्तीत जास्त उच्च शिक्षित लोक सोशल माध्यम वापरतात.तरही सोशल मीडिया मध्ये फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले आहेत.हि नक्कीच गंभीर स्वरूपाची बाब आहे पण या मध्ये जागृती हा एकमेव बचावाचा अंतिम उपाय आहे . म्हणून सोशल माध्यम हे सध्या फसवणुकीच्या विळाख्यात आहे .असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.पण आपली जागरूकता हा आपला बचाव आहे . म्हणून मेसेज करून कोणीही बनावट किंवा सत्य खात्यावर आपल्या सोबत चर्चा करतय किंवा पैसे मागतय हे आपल्याला खात्री होई पर्यंत किंवा सत्यता पडताळून पाहील्याशिवाय अंतिम निर्णय घेऊ नये . फेसबुक वर अनेक खोटी किंवा अनेक वेगवेगळ्या नावांनी खाते निर्माण करून काही वृत्ती प्रवृत्ती कार्यरत आहेत.आणि अशा वृत्ती प्रवृत्ती कडुन आपली फसवणूक होऊ नये म्हणून आपल्याला आवश्यक ती काळजी दक्षाता घेता आली पाहिजे .हिच आपल्यासाठी मोठी खबरदारी आहे . आपल्याला सोशल माध्यमावर अनेक ओळखितील किंवा अनोळखी खातयावरून संदेश येत असतात अशा वेळी आपण किती आणि सज्जग असलं पाहिजे आणि आपला बचाव करण्यासाठी काय केलं पाहिजे .तर त्यासाठी आवश्यक आहे सगळ्यात अगोदर मेसेज आला कि सर्व प्रथम मोबाईल नंबर मागणी करण आणि मोबाईल वर प्रत्यक्ष बोलणं व जो पर्यंत खात्री होत नाही तोपर्यंत जास्तीच वार्तालाप न करणे किंवा गोपीनिय महिती न सांगणं तसेच आर्थिक जोखिम न उचलण हे महत्त्वाचे आहे . आणि या मध्ये जो पर्यंत लोक जागृती होणार नाही तो पर्यंत हे असे प्रकार थांबणार नाहीत.प्रत्येक बाबीचे दोन परिणाम असतात .एक चांगला परिणाम आणि एक वाईट परिणाम पण वाईट परिणाम होऊ देयचा नसेल तर आपण जागरूक आसल पाहिजे.सोशल माध्यम वापरताना आपण अनेक ठिकाणी पाहतो कोणतरी कोणाच तरी नाव वापरून गैर कृत्य करत असत . किंवा कुणाचं तरी नाव वापरून परस्पर खात काढुन त्याचा वापर अनेकांशी चर्चा करण्यासाठी होताना आपण पाहतोय आणि असा प्रकार आपल्या सोबत झाला तर आपणं सजग असलं पाहिजे.आणि या मध्ये पैशाची मागणी झाली तर पैसाची मागणी करणारे ओळखितील कायद्याबद्दल प्रथम आपण खातरजमा केली पाहिजे तसेच खात्री होई पर्यंत विश्वास सिद्ध होईपर्यंत आपण अंतिम निर्णय घेतला नाही पाहिजे पण खरंच आपण असं करतो का तर नाही करत .मग आशा वेळी नेमकी आपण काय खात्री करतो . सत्यता काय पडताळणी करतो .तर काहीच नाही . खरंच एखाद्याला खारया अर्थाने आपण समोरा समोर मदत करू शकतो का तर नक्कीच नाही.मग आपण काही क्षणात शोशल माध्यमात काहीच खात्री न करता कसं काय फसलो जातो .समाजा एखाद्या सोशल मीडिया तील खात्यावरूर संदेश मिळाला आपण प्रथम काय केलं पाहिजे.तर अगोदर मोबाईल नंबर मागितला पाहिजे.दोन मिनिटांचा वेळ काढून प्रत्यक्ष फोन करून खात्री केली पाहिजे . आणि खात्री होई पर्यंत पुढे संदेश किंवा चर्चा करू नये . समोरून किती ही लिहल तरी आपण फक्त मोबाईल नंबर मागितला पाहिजे आणि प्रत्यक्ष बोलणं होई पर्यंत विश्वास ठेवला नाही पाहिजे .सोशल माध्यम आज जरी प्रभावी व जीवन आवश्यक असली तरी आपण ज्या पद्धतीने त्याचा वापर करतोय त्या मध्ये सुद्धा आर्थिक फसवणूक आणि विविध वेगवेगळ्या पद्धतीचे बनावट खाते उघडले जात आहेत .हि गंभीर अशी समस्या समोर येत असते . आणि आपली जागरूकता हिच आपल्या बचावाची प्रभावी बाजु आहे . लोक जागृती निर्माण होऊन प्रत्येकाने आपला स्वतःचा बचाव करण्यासाठी जागरूक राहण्याची आवश्यकता आहे.
गणेश खाडे
संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक 9011634301