
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे.
देगलूर:कै. बापूसाहेब पाटील एकंबेकर ग्रामीण महाविद्यालय हणेगाव अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दि. १५ ऑक्टोबर २०२२ हा दिवसडॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती म्हणून साजरा करण्यात आली. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा रा.स.यो कार्यक्रमधिकारी, व हिंदी विभाग प्रमुख डॉ. उमाकांत बिरादार यांनी भूषविले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून इतिहास विभाग प्रमुख डॉ. अशोक साबणे हे उपस्थित होते. प्रो.डॉ. उत्तम मानवते यांनी ‘डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांचे जीवन कार्य । ‘या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रम प्रसंगी रा. से.यो विभागाच्या वतीने स्वयंसेवकांनी महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पवन एमेकर यांनी केले. तर आभार डॉ. दिलीप जाधव यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. चरणसिंह राठोड, डॉ. कळसकर सूर्यकांत, डॉ. आनंद शिंदे, डॉ.सागावे वसंत, प्रा. सौ. कांबळे सुनीता, प्रा. सौ. शिलादेवी कांबळे, जयप्रकाश झमाकडे, शंकर राठोड, मारोती चव्हाण, सुरेवाड, वाघमारे, मचकूरी आदि.