
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
“”””””””””””'”””‘”“””””””””””””””””””””””””””
परभणी : ऑक्टोबर महिन्यात पडलेला कुठे मुसळधार तर कुठे संततधार पाऊस परतीचा असला तरी तो भयान असा नुकसान लायकी ठरला. साल भागात गुडघाभर साचलेल्या आणि नदी नाल्याच्या वाहून आलेल्या भरतीच्या पाण्यामुळे हातात तोंडाशी आलेली सर्व पिके नष्ट झाली आहेत त्यामुळे अगोदरच्या पावसाने मेटाकुटीला आलेला शेतकरी वर्ग पूरता कोलमडला आहे. परिणामी गावोगावच्या शेतकऱ्यांमध्ये कमालीचा संताप नि आक्रोश पुढे येवून लागला. या व अशा गंभीर परिस्थितीचा सर्वंकष विचार करून परभणीचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्याचे व त्यांना आर्थिक मदत मिळली जावी यासाठीचे निर्देश दिले.
जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सुध्दा पालकमंत्र्याच्या आदेशाचे अनुपालन करीत महसूली व कृषी विभागाच्या कार्यालयांना प्रत्यक्ष स्थळी जाऊन पंचनामे करण्याचे निर्देश दिले. त्या अनुषंगाने आजपासूनच संबंधित दोन्ही विभागाच्या यंत्रणा पूर्णपणे कामाला लागल्या आहेत. त्यामुळे प्राथमिक स्वरुपात का होईना परंतु शेतकरी वर्गात दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे.
सत्तांतर झाल्यानंतर ओढवलेले अस्मानी संकट, हातात तोंडाशी आलेली खरीप पिके बघता बघता नष्ट झाली. परिणामी मेटाकुटीला आलेल्या शेतकरी वर्गाला शक्य होईल तेवढी मदत देता यावी या उदात्त हेतूने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुध्दा युध्दपातळीवर मदतीचे प्रयत्न सुरु ठेवले. त्याच अनुषंगाने संबंधित पालकमंत्र्यांना निर्देश देऊन तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत केली जावी यासाठी तत्परता दाखवली जावी असे सूचित केले. तद्वतच पालकमंत्री तानाजी सावंत यांनीही जोरकश असे प्रयत्न सुरु ठेवले आहेत. जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनीही सन्माननीय मंत्र्यांच्या आदेशाचे अनुपालन करीत महसूली व कृषी विभागाच्या यंत्रणांना प्रत्यक्ष नुकसान स्थळी जाऊन जाणीवपूर्वक कोणाचेही नुकसान होणार नाही याची दक्षता घेत पंचनामे करण्याचे आदेश दिले. उभय यंत्रणाही तात्काळ त्या कामाला लागल्या असल्याने तूर्तास तरी शेतकऱ्यांमध्ये दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे.