
दैनिक चालू वार्ता शिराढोण सर्कल प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
उस्माननगर येथून जवळच असलेल्या लाठ (खुर्द)ह्या रस्त्याची दैनिय अवस्था झाली आहे हा रस्ता उस्माननगर येथून अंदाजे तीन ते चार किलोमीटर अंतरावर लाठ ( खु)हे गाव आहे.हा रस्ता काही वर्षां आगोदर पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत बनविण्यात आला होता ह्या रस्त्यावरून नांदेड हून उस्माननगर ,लाठ (खू) मार्गे आलेगाव, मंगलसागवी, बारूळ ह्या गावासाठी ये जा करण्यासाठी सोईचा रस्ता असून येणाऱ्या -जाणाऱ्या वाहनचालक व शेतकऱ्यांना नहाक त्रास सहन करावा लागत आहे.व शाळेतील विद्यार्थ्यी यांना उस्माननगर ला शाळेला ये जा करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे ह्या शाळेची बस विद्यार्थ्यांना आणण्यासाठी दहा किलोमीटर चा रस्ता पारकरून ये जा करावे लागत आहे.
नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाचे काम युध्द पातळीवर चालू असून केटी कंट्रक्शन या परिसरातील मूरूम मोठ्या प्रमाणात त्यांच्या जड मोठ्या वाहनांतून मुरूम नेला जात असताना मोठ्या प्रमाणावर रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
रस्त्याने प्रवाशांचे हाल होत आहे. या ठिकाणी खड्डा की खड्डयात रस्ता हेच कळेनासे झाले आहे. या परिसरातील नागरिकांना नांदेड व उस्माननगर येथे कामासाठी जावे लागत असते. तसेच येथील नागरिकांचे त्या भागात शेती असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतातला माल घराकडे आणताना खुप तारेवरची कसरत करावी लागत आहे.या रस्त्यावर सतत छोटे मोठे खड्डे पडले आहेत . त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या रस्त्यावर नेहमी मोठया प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. मोठ्या प्रमाणात मुरूमाचे उत्खन होत आहे.त्यांच्या जड वाहने रस्त्यावर भरधाव चालत असल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे..
रस्ता खराब झाल्यामुळे वाहन चालवताना त्रास सहन करावा लागत आहे.तरी संबंधित सा.बा.वि. अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.