
दैनिक चालू वार्ता उस्माननगर प्रतिनीधी -लक्ष्मण कांबळे
उस्माननगर : – येथील आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सभागृहाला दैनिक चालू वार्ता चे मुख्य संपादक श्री डि.एस.लोखंडे पाटील यांची दिपावली निमित्त सदिच्छा भेटी दरम्यान उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीने दिपावली निमित्त सदिच्छा भेटी दरम्यान दैनिक चालू वार्ता चे मुख्य संपादक श्री.डि.एस.लोखंडे पाटील यांचा शाल श्रीफळ देऊन यथोचित सत्कार केला.यावेळी ओंकार लोव्हेकर , ( मराठवाडा उपसंपादक ) दत्ता पवार ( प्रतिनिधी शिवाजीनगर पुणे ) व्यंकटेश ताटे ( प्रतिनिधी पुणे ) बाजीराव पाटील कळकेकर ( कंधार तालुका प्र.) माधव गोटमवाड ( तालुका प्रतिनिधी ) तसेच राहुल सोनसळे ( मुख्याध्यापक सम्राट अशोक प्राथमिक शाळा ) विश्वाभंर मोरे ( पोलीस पाटील ) यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी श्री लोखंडे पाटील म्हणाले की , पत्रकार संघाचे कार्य चांगले असून एकजूटीतून संघाची ओळख निर्माण होते.ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न समोर आनले पाहिजे ,
दैनिक चालू वार्ता न्युज पेपर हा समाजात रूजत आहे.दै.चालू वार्ता महाराष्ट्रातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवणार आहे.समाजावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध जोरदार प्रतिकार करून आवाज उठवेल व गोरगरिबांचे कामे पण तात्काळ करतात व ज्वलंत प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाला भाग पडेल असे मत व्यक्त केले. मुख्य संपादक श्री लोखंडे पाटील यांची दिपावलीच्या सदिच्छा भेट ही सर्व पत्रकार साठी शिदोरी असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी प्रतिक देशमुख यांनी सिव्हिल पॅड बनवल्या बद्दल दै.चालू वार्ता चे मुख्य संपादक श्री डी.एस. लोखंडे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.व जवाहरलाल नेहरू विद्यार्थ्यी वसतिगृह उस्माननगर येथे संपादक श्री डी.एस लोखंडे पाटील याचा सत्कार रोहीदास कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी संघाचे अध्यक्ष गणेश लोखंडे, उपाध्यक्ष माणिक भिसे, सचिव प्रदीप देशमुख,कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, यांच्या सह प्रतिक देशमुख, रघुनाथ भिसे यांची उपस्थिती होती.सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.