
दैनिक चालू वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
उस्माननगर :- भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड च्या वतीने धम्म चक्र प्रवर्तन दिनानिित्ताने दि. 5 नोव्हे.2022 रोजी नांदेड येथे होणाऱ्या भव्य धम्म मेळाव्यास हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा शाखा शिराढोण यांच्या वतीने करण्यात आले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 ला नागपूर येथे बौद्ध धम्मदीक्षा देऊन महान धम्मक्रांती केली त्यामुळे बौद्धांना प्रतिष्ठेने जगण्याची संधी प्राप्त झाली. बौद्धांचा दर्जा,अधिकार,संरक्षण आणि बौद्धांच्या प्रगतीसाठी आवश्यक असणाऱ्या सवलती त्याच प्रमाणे धम्म दिक्षेसाठी धम्म स्वातंत्र्य अबाधित रहाणे यासह अनेक बाबीवर विचार करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड च्या वतीने बौद्धांचा भव्य धम्म मेळावा शनिवार दि. 5 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 12 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान, नवा मोंढा नांदेड येथे आयोजित केला आहे.या भव्य धम्म मेळाव्यास श्रध्देय, अॅड. माजी खा. बाळासाहेब आंबेडकर तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्ष भिमराव यशवंतराव आंबेडकर मार्गदर्शन करणार आहेत.
या धम्म मेळाव्यास भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय चेअरमन डॉ.हरीश रावलिया, कॅपटन प्रवीण निखाडे यांच्यासह राष्ट्रीय उपाध्यक्ष जगदिश गवई, एस. के.भंडारे, सचिव एस. एस. वानखडे, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष भिकाजी कांबळे, सचिव संबोधी सोनकांबळे, दैवशाला गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी या मेळाव्याला सर्व कंधार तालुक्यातील बौद्ध उपासक,उपसिका आणि आंबेडकरी अनुयायांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा शाखा शिराढोण चे अध्यक्ष मनोज जमदाडे शिराढोणकर यांच्या वतीने करण्यात येत आहे.