
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- प्रदिप मडावी
चंद्रपूर
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर येथे पदावर नुकतेच रूजू झालेले सहा.जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मुरूगानथम.एम.(IAS) यांची गोंडवाना आदिवासी शिक्षण संस्थेचे सचिव तथा प्रकल्प स्तरीय आढावा समितीचे माजी अध्यक्ष बापुराव मडावी, TRTS संस्था पुणे चे सदस्य तथा आफ्रोट संघटनेचे राजुरा तालूका अध्यक्ष डॉ.मधुकर कोटनाके, बिरसा क्रांती दलाचे माजी जिल्हाध्यक्ष सामजिक कार्यकर्ते संतोष कुळमेथे यांनी चंद्रपूर कार्यालयात सदिच्छा भेट घेतली व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
या वेळी श्री.मुरूगनाथम एम.(IAS)यांचे सोबत अनेक प्रलंबित प्रश्नावर चर्चा केली.
यात मुख्यतः शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वसतीगृहे व आश्रमशाळा सुरू करणे, शिक्षणात होणारी अनियमितता,शिक्षण क्षेत्रात करावयाच्या उपाययोजना, कोलाम बांधवांच्या मुलभूत व भौतिक सुविधांच्या समस्या, आदिवासी उपयोजना क्षेत्रातील आरोग्य, शिक्षण,पिण्याचे पाणी,विज,रस्ते आदी प्रश्नावर चर्चा करण्यात आली.
जनजातीय बांधवांना जातीचे दाखले काढण्यासाठी येणाऱ्या अडचणी वर मार्ग काढून सर्वांना जातीचे दाखले कसे मिळेल यावर श्री.मुरूंगनाथम साहेब यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवत समस्या सोडविणार असल्याचे सांगितले.
अनुसूचित क्षेत्रातील गावांना लागु असलेल्या पेसा (PESA) कायद्यातील तरतुदी व निधी चार होणारा अपव्यय थांबविण्यासाठी जिल्हापरिषद अधिकारी,गा.प.पदाधिकारी, कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांची संयुक्त बैठक घेण्या बाबतही सकारात्मकता दाखविली.चर्चेत कोलामांच्या समस्या वर जास्तीत जास्त योजना राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
कोलाम बांधवापर्यत शासकीय योजना पोहचविण्यासाठी कोलाम गुंड्या पैकी पांच गुड्यांची निवड करून त्या माॅडेल वस्त्या बनविण्याची सुचना बापुराव मडावी यांनी केली.यावर सुध्दा त्यांनी सकारात्मकता दर्शविली. समस्या अनेक असल्यातरी टप्या-टप्यांने सोडविण्यासाठी सहकार्य करण्यावर सविस्तर चर्चा झाली.
कोलाम बांधवांच्या समस्येवर प्रकाश टाकणारे व डॉ.मधुकर कोटनाके यांनी लिहिलेले ” कोलाम गुड्याची शिक्षण यात्रा ” हे पुस्तक भेट देण्यात आले.