
दैनिक चालू वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
उस्माननगर:- मागील एक महीन्यापासून केटी कंट्रक्शन यांच्या वाहनातून सरास मूरूम उत्खननामुळे रस्त्याची चाळणी झाल्यामुळे भरधाव वेगाने चालणा-या वाहनांमुळे गट क्रमांक ९२६ व ९४४ या शेतातील उभ्या पिकाचे धुळीच्या कनामुळे आतोनात नुकसान झाल्याची उस्माननगर येथील शेतकरी घोरबांड मारुती बालाजी यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱी यांच्या कडे तक्रार केली .सविस्तर माहीती असी की,उस्माननगर ते मौजे लाठ (खुर्द )रोड वरील माळरानावरून मागील अनेक दिवसांपासून केटी कंट्रक्शन च्या जड वाहनातून रात्रंदिवस मुरूमाचे उत्खनन होत आहे.लाठ (खुर्द ) माळरानावरून भरधाव वेगात जात असल्यामुळे डांबरीकरण असलेलया रोडची जड वाहनांमुळे चाळणी झाली आहे.वेगाने चालणा-या वाहनांमुळे धूळीचे प्रमाण वाढले आहे.उस्माननगर येथील शेतकरी घोरबांड मारोती बालाजी यांचे लाठ (खुर्द )कडे जाणा-या रोड वर शेत आहे .सदरील रोड वर अक्षरश या वोवर लोडिंग वहातूकेमूळे रस्ता खड्डेमय झालेला आहे त्या रस्यातून शेतक-याना पायी चालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे .सदरील टिपरामध्ये कायद्याच्या नियमानुसार वाहनातून वहातूक करतांना कुठलेही नियम,वाहनावर ताडपतरी बांधण्यात येत नसल्यामुळे त्या रोडच्या कडेला असलेल्या शेतक-याच्या शेतीमधील पिकावर धुळीच्या कनामुळे अतोनात नुकसान होत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे केटी कंट्रक्शनच्या जड वाहनामुळे नुकसान झालेल्या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून शेतीमधील झालेल्या मालाच्या नुकसानीचा मोबदला ( भरपाई) मिळवून द्यावी अशी मागणी शेतक-यांनी केली आहे.